शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

विचित्र अपघात : रिक्षासह एसटी बस विहिरीत; 25 प्रवासी ठार, 30 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 06:22 IST

कळवण आगाराची बस धुळ्याहून कळवणकडे जात होती.

नाशिक : टायर फुटून एसटी महामंडळाची धुळे-कळवण बस शेजारून जाणाऱ्या अ‍ॅपे रिक्षावर आदळली. नंतर रिक्षा व बस रस्त्याजवळच्या शेतातील खोल विहिरीत पडून झालेल्या भीषण अपघातात २५ जण ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कळवण आगाराची बस धुळ्याहून कळवणकडे जात होती. या बसच्या शेजारून प्रवाशांनी भरलेली अ‍ॅपे रिक्षा जात होती. त्याच वेळी बसचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस शेजारच्या रिक्षावर धडकली. त्यानंतर, रिक्षाला फरफटत नेत बसही विहिरीत कोसळली.अपघातानंतर प्रवाशांनी आक्रोश सुरू केला. तो आरडाओरडा ऐकून आसपासचे शेतकरी मदतीसाठी धावले, परंतु विहिरीत उतरण्यासाठी जागाच नव्हती. विहिरीत सुमारे २५ ते ३० फूट पाणी होते. त्यात रिक्षा आणि त्यावर बस अशी स्थिती होती. काही स्थानिकांनी बसची पाठीमागची काच फोडली आणि आतमध्ये शिरून जखमी प्रवाशांना एकेक करून बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी बसमधून ८ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले.

जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालय तसेच उमराणे व मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर हेही मदतकार्यात सहभागी झाले. क्रेनच्या साह्याने बस बाहेर काढण्यात आल्यानंतर रिक्षा बाहेर काढण्यात आली. अंधारामुळे मदतकार्यात अडथळे येत होते.जखमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.पी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, देवळ्याचे ग्रामीण रुग्णालय व कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुुरू केले. देवळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनचेही त्यांना या कामात मदत केली. अपघातस्थळी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी धाव घेतली आणि मदतकार्य वेगाने सुरू झाले.मुलासाठी मुलगी पाहून येताना..!मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील आझीम मन्सुरी यांचा मोठा मुलगा उस्मान मुंबईत बस चालक आहे. उस्मानचे आठ दिवसांपूर्वीच धुळे येथील हुसेन मन्सुरी यांची कन्या शबनमशी लग्न ठरले. दुसरा मुलगा रशीदला स्थळ बघायला देवळा येथे कुटुंबीय रिक्षाने गेले होते. परतत असताना ते अपघातात मरण पावले.

मृतांची समजलेली नावेअझीम मन्सुरी, अन्सारभाई मन्सुरी, शाहीस्ता मन्सुरी, जावेद मन्सुरी, कुर्बान मन्सुरी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, फारुख मन्सुरी, रघुनाथ मेतकर, अझीम नथू मन्सुरी, एसटी चालक प्रकाश बच्छाव, शांताराम निकम, शीतल अहिरे, मालेगाव उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिका अंजना झाडे.

- एसटी बसमध्ये ४६ तर रिक्षामध्ये ९ प्रवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक