S.T. Bus, public utility | एस.टी. बस, सर्वसामान्यांची लोकवाहिनी
एस.टी. बस, सर्वसामान्यांची लोकवाहिनी

ठळक मुद्देसिन्नर तालुक्यात जलसेवा दिली जात आहे.शहर वाहतुकीची जबाबदारी महापालिका सांभाळणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली त्या लालपरीला दि.१जून रोजी ७१ वर्ष पुर्ण होत आहे. राज्यातील सर्व ५६८ बसस्थानकांवर एस.टी चा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. नाशिकमध्ये देखील विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रवाशी सेवेत प्रदिर्घकाळ धावणाऱ्या लालपरीविषयी  नाशिक विभाग नियंत्रक  नितीन मैंद यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रवाशांच्या सेवेत अविरत धावणा-या लालपरीच्या अर्थात महामंडळाच्या प्रवासी सेवेकडे आपण कसे पाहता?

- राज्यातील कोट्यावधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेली लालपरी महाराष्टÑाची जीवनवाहिनी बनलेली आहे. या सेवेत मोठी स्पर्धा निर्माण झाली असली तरी एस.टी महामंडळाने मिळविलेली विश्वासहार्यता इतर कुठल्याही सेवेला मिळालेली नाही. प्रवाशांच्या सेवेसेठी असे ब्रीद घेऊन चाललेली राज्य परिवहन महामंडळाची सेवा अधिकाधिक प्रवासीभीमुख होत आहे.

नाशिकमधील प्रवासी सेवा आणि महामंडळाची भूमिका याविषयी काय सांगाल?
महामंडळाने शहरी आणि ग्रामीण बससेवा अनेक वर्ष चालविली आता नियमानुसार शहर वाहतुकीची जबाबदारी महापालिका सांभाळणार आहे. असे असले तरी ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहाणार नाही. आधुनिक बसस्थानके, शटल सेवेत होणारी वाढ आणि गाड्यांची संख्या वाढल्यामुळे ग्रामीण भागातील सेवा अधिक तत्पर होणार आहे.

शिवशाही बस विषयीच्या अनेक तक्रारी आहेत?
हे खेर आहे की शिवशाही बसेसचे अपघात आणि सेवेबाबतच्या तक्रारी आहेत. परंतु आता अपघात विरहिस सेवेसाठीची विशेष मोहिम आम्ही राबविणार आहोत. यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन केलेले आहे.

महामंडळाच्या सामाजिक बांधिलकीविषयी काय सांगाल?
प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या संकटात एस.टीन. आर्थिक मदतीचा हात पुढे केलेले आहे. दुष्काळी गावात टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात जलसेवा दिली जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची तसेच गोरगरीबांच्या मुलांच्या शैक्षणिक पास सुविधेला सवलत देण्याची बांधिलकी जपली आहे.


Web Title: S.T. Bus, public utility
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.