निवडणुकीतून एसटी कोट्यधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:54 AM2019-11-02T01:54:52+5:302019-11-02T01:55:12+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवस वापरण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ६०० बसेसच्या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले आहे.

 ST BILLIONS FROM ELECTIONS | निवडणुकीतून एसटी कोट्यधीश

निवडणुकीतून एसटी कोट्यधीश

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवस वापरण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ६०० बसेसच्या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी देण्यात आलेल्या सुविधेसाठी जिल्हा निवडणूक शाखेने एसटीला १ कोटी २९ लाख रुपये अदा केले आहेत. या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या बीएसएनएलच्या वेबकास्टिंग सेवेसाठीदेखील निवडणूक शाखेने कोट्यवधी रुपये अदा केले आहेत.
ङङजिल्ह्यातील पंधरा मतदार- संघांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामीण आणि शहरी भागात मतदान केंद्रे असल्यामुळे या केंद्रांवर पोहोचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचा वापर करण्यात आला. शहरातील तीन मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व मतदारसंघ हे ग्रामीण भागात तर इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकसारख्या अतिदुर्गम भागातही अनेक मतदान केंद्रे होती. साडेचार हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रांच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करताना सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ६०० बसेसचा वापर करण्यात आला.
मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी नेहमीप्रमाणेच बसेसचे नियोजन करण्यात आले होते. व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीनची सुरक्षितरीत्या वाहतूक करणे यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गरज होती. त्यासाठी निवडणूक शाखेने अडीच हजार छोटी-मोठी वाहने भाड्याने घेतली होती. त्यात एसटी महामंडळाच्या ६०० बसेसचा समावेश होता. जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात दळणवळण सुविधेअभावी मतदान साहित्याची वाहतूक करणे अवघड होते. त्यामुळे एसटीची मदत घेण्यात आली होती. कोणत्याही निवडणुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्राधान्य दिले जाते. गाव खेड्यापर्यंत असलेले जाळे आणि सुरक्षितता यामुळे एसटीला प्रथम पसंती दिली जाते.
वेबकास्टिंगसाठी बीएसएनएलही मालमााल
मतदारकेंद्रांवरील हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच ज्या ठिकाणी संपर्क साधनांची कनेक्टिव्हिटी नाही अशा ठिकाणी बीएसएनलच्या वेबकास्टिंग सुविधेचा वापर करण्यात आला. त्यामुळे मतदान केंद्रांवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. त्यातून काही गैरप्रकारांना आळा घालणेदेखील शक्य झाले होते. जिल्ह्यातील १५ मतदारसंघात ४ हजार ५७९ मतदान केंदे्र होती. त्यापैकी ४५७ मतदान केंद्रांचे बीएसएनएल नेटवर्कच्या माध्यमातून वेबकास्टिंग करण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आला होता. मतदान यंत्रे वाहतूक वाहनांना जीपीएस यंत्रणेद्वारे वॉच ठेवण्यात आला. या सेवेसाठी बीएसएनएल कंपनीला नाशिक कार्यालयास १ कोटी ३८ लाख रु पयांचे देयक अदा करण्यात आले.
महामंडळाकडून घेण्यात आलेल्या बसेसच्या सेवेपोटी एसटीला १ कोटी २९ लाख रु पयांचे देयक जिल्हा प्रशासनाने दिले आहे. सदर देयक अदा करण्यात आले असून, महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली आहे.
लोकसभा निवडणुकीतही महामंडळाला कोट्यवधी रुपये मिळाले होते. निवडणुकीच्या माध्यमातून महामंडळाच्या उत्पन्नाला हातभार लागत आहे. बसेसचा तुवटडा होऊ नये यासाठी अतिरिक्त बसेस तैनात होत्या.

Web Title:  ST BILLIONS FROM ELECTIONS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.