त्र्यंबक विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल ७९.३१ टक्के

By Admin | Updated: June 30, 2014 01:10 IST2014-06-30T01:06:16+5:302014-06-30T01:10:29+5:30

त्र्यंबक विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल ७९.३१ टक्के

SSC of Trimbak school The result is 79.31 percent | त्र्यंबक विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल ७९.३१ टक्के

त्र्यंबक विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल ७९.३१ टक्के

त्र्यंबकेश्वर : येथील नूतन त्र्यंबक विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल ७९.३१ टक्के लागला असून, यामध्ये मुलींपेक्षा मुलांनी बाजी मारली तर पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये सर्वच मुले आहेत. दरवर्षीची मुलींची परंपरा यावर्षी मुलांनी मोडीत काढली आहे. प्रथमेश दशरथ बडेराव या विद्यार्थ्याने ८0.६0 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने त्र्यंबक विद्यालयात उत्तीर्ण झाला.
अन्य प्रथम पाच मध्ये दुसरा क्रमांक पांडुरंग शिंदे ७६.८0 टक्के, संतोष मंचरे ७५.४0 टक्के, बाळासाहेब काळे ७४.२0 टक्के, कुंजल दशपुत्रे ७५ टक्के गुण मिळाले. यावर्षी एकूण २0३ विद्यार्थी एस.एस.सी. परीक्षेस बसले होते. त्यापैकी १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मुख्याध्यापक एम. डी. पवार यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: SSC of Trimbak school The result is 79.31 percent