श्री विष्णू यागास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:49 IST2018-06-11T01:49:10+5:302018-06-11T01:49:10+5:30

नाशिक : सनातन वैदिक धर्मसभा आयोजित यजुर्वेद मंदिरात विष्णू यागास दीपप्रज्वलन आणि श्री विष्णू भगवान यांचे प्रतिमापूजन करून मंत्रघोषात प्रारंभ झाला.

Sri Vishnu Yagas start | श्री विष्णू यागास प्रारंभ

श्री विष्णू यागास प्रारंभ

नाशिक : सनातन वैदिक धर्मसभा आयोजित यजुर्वेद मंदिरात विष्णू यागास दीपप्रज्वलन आणि श्री विष्णू भगवान यांचे प्रतिमापूजन करून मंत्रघोषात प्रारंभ झाला.
भालचंद्रशास्त्री शौचे, डॉ. श्रीकृष्णबुवा सिन्नरकर यांनी दीपप्रज्वलन केले, प्रतिमापूजन अजय देशपांडे, हेरंब गोविलकर यांनी केले. श्री विष्णू यागाचे यजमानपद हेरंब गोविलकर, अजय देशपांडे, कौस्तुभ शौचे, नीलेश पाराशरे, श्रीपाद सिन्नरकर, शशिप्रभा घमंडी, पद्माकर जोशी, वैभव झंवर, नंदकुमार फुलांब्रीकर, अरविंद सरोदे यांनी केले. तसेच बाळशास्त्री आंबेकर यांना जीवनगौरव पुरस्कार वितरण सोमवारी (दि. ११) दु. ५ वाजता होणार असून, यात सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन वैदिक धर्मसभेचे उपाध्यक्ष भानुदास शौचे, चंद्रशेखर क्षीरसागर, प्रफुल्ल गायधनी यांनी केले आहे.

Web Title: Sri Vishnu Yagas start