श्री श्री रविशंकर राज्य शासनाचे अतिथी

By Admin | Updated: January 13, 2015 00:37 IST2015-01-13T00:37:00+5:302015-01-13T00:37:31+5:30

श्री श्री रविशंकर राज्य शासनाचे अतिथी

Sri Sri Ravi Shankar's Guest of State | श्री श्री रविशंकर राज्य शासनाचे अतिथी

श्री श्री रविशंकर राज्य शासनाचे अतिथी

नाशिक : श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे विशेष अतिथी म्हणून घोषित केले असून, त्यामुळे त्यांच्या राजशिष्टाचाराची जबाबदारी आता शासनावर आली आहे. जिल्हा प्रशासनाला सोमवारी यासंदर्भातील आदेश प्राप्त झाले. रविशंकर हे राज्य शासनाचे विशेष अतिथी असल्याने त्यांच्या मुंबई व नाशिक दौऱ्यात शासकीय विश्रामगृह व राजशिष्टाचार पाळला जावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सायंकाळी नाशिक तहसीलदार गणेश राठोड यांनी त्यांची भेट घेऊन शासनाच्या वतीने स्वागत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Sri Sri Ravi Shankar's Guest of State