नाशिक : आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली होती. शनिवारी (दि.४) दुपारनंतर शहरात ढगाळ हवामान दाटून आल्याने पावसाचा शिडकावा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संध्याकाळपर्यंत तीन मि.मी. तर पंचवटी-पेठरोड परिसरात एक मि.मी. पाऊस पडल्याची नोंद संबंधित यंत्रणेकडून करण्यात आली.कमी दाबाचा पट्टा निर्माण न होणे आणि मान्सून कमकुवत असल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. जुलै माहिन्यातदेखील फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही. मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप दिली होती. कमाल तपमानही २८ अंशांपर्यंत सरकले होते. शनिवारी पावसाचा शिडकावा झाल्यामुळे तपमान २६ अंशांवर आले तर किमान तपमान २२.१ अंश इतके नोंदविले गेले. वातावरणात आर्द्रता सकाळी साडेआठ वाजता ९७ टक्के तर संध्याकाळी ८२ टक्के इतकी होती.
आठवडाभरानंतर शहरात पावासाचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:56 IST
कमी दाबाचा पट्टा निर्माण न होणे आणि मान्सून कमकुवत असल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. जुलै माहिन्यातदेखील फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही.
आठवडाभरानंतर शहरात पावासाचा शिडकावा
ठळक मुद्देकमी दाबाचा पट्टा निर्माण न होणे आणि मान्सून कमकुवत असल्यामुळे पावसाचे प्रमाण घटलेसंध्याकाळपर्यंत तीन मि.मी. तर पंचवटी-पेठरोड परिसरात एक मि.मी. पाऊस