आरोग्य केंद्रात जंतुनाशक औषधाची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:24 IST2020-04-20T00:23:44+5:302020-04-20T00:24:10+5:30

इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे.

Spraying pesticides at health centers | आरोग्य केंद्रात जंतुनाशक औषधाची फवारणी

काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जंतुनाशक औषधांची फवारणी करताना तुकाराम वारघडे. समवेत आरोग्यसेविका व ग्रामस्थ.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : गाव केले स्वच्छ; सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी

नांदूरवैद्य : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीसोबतच शहरांसह ग्रामीण भागातदेखील जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे.
काननवाडी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक स्वच्छतागृहे आदी ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आश्रमशाळा आदी परिसर तुकाराम वारघडे यांनी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत फवारणी यंत्र हातात घेऊन फवारणी केली.
दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढण्याच्या घटना कानावर पडत असतानाही खबरदारी म्हणून संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर औषधाची फवारणी करण्यात येत असल्याचे वारघडे यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांनीदेखील या परिस्थितीत बाहेर पडू नये, हात वारंवार स्वच्छ धुवा अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Spraying pesticides at health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.