वाकेत जंतुनाशक औषधांची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:04 IST2020-04-02T22:04:03+5:302020-04-02T22:04:26+5:30

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली.

Spraying pesticides | वाकेत जंतुनाशक औषधांची फवारणी

मालेगाव तालुक्यातील वाके येथे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेली जंतुनाशक औषधांची फवारणी.

वाके : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. कोरोना रोगावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने सूचना फलक व दवंडीद्वारे अत्यावश्यक सूचना देण्यात आल्या. ग्रामस्थांनी पाण्याने हात स्वच्छ धुवावे, ग्रामस्थांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ग्रामसेवक सतीश इंगळे यांनी केले. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच भागाबाई बच्छाव, उपसरपंच विमल बागुल, ज्ञानेश्वर बच्छाव, भारती देवरे, प्रकाश बच्छाव, श्रीमती मंगल बच्छाव, मीरा काकळीज, सरीता नारळे, मुकुंदा निकम, समाधान बच्छाव, देविदास ठाकरे, राजेंद्र काकळीज आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Spraying pesticides