घोटीत जंतुनाशकाची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 22:55 IST2020-04-20T22:55:03+5:302020-04-20T22:55:20+5:30
संपूर्ण जग कोरोनामुळे हैराण झाले असून, शहरासह ग्रामीण भागातील गावेसुद्धा पछाडल्या गेल्याने प्रशासनासह विविध सामाजिक संघटना पुढे येऊन हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी अन्नछत्र, किराणा वाटप करत आहे, तर कुणी गाव निर्जंतुकीकरणासाठी सरसावले आहेत.

घोटीत जंतुनाशकाची फवारणी
घोटी : संपूर्ण जग कोरोनामुळे हैराण झाले असून, शहरासह ग्रामीण भागातील गावेसुद्धा पछाडल्या गेल्याने प्रशासनासह विविध सामाजिक संघटना पुढे येऊन हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी अन्नछत्र, किराणा वाटप करत आहे, तर कुणी गाव निर्जंतुकीकरणासाठी सरसावले आहेत.
घोटी येथे मनसे व लॉयन ग्रुपच्या वतीने जंतुनाशक फवारणी अभियान हाती घेण्यात आले असून, घोटी शहरातील मुख्य रस्ते, पोलीस स्टेशन, ग्रामीण रूग्णालय, दवाखाने, हॉस्पिटल, मंदिरे, गल्ली-बोळा, यासह संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शहरातील मंदिरातील देवसुध्दा
कोरोनाच्या विळख्यातून सुटले नाही असा भास व्हायला लागला
आहे.
शहराचे आराध्य दैवत असलेल्या पुरातन संकटमोचन हनुमान मंदिराची पुनर्बांधणी सुरू असून, या ठिकाणी दररोज नागरिकांची दर्शनासाठी रांग लागलेली असते. परंतु बंदमुळे भािवक नाही. मंदिराच्या पुजाऱ्याकडून विधिवत पुजन सुरू आहे. गावात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे.
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व लॉयन फाउण्डेशनचे संस्थापक संदीप किर्वे यांच्या वतीने गावात जंतुनाशकाची फवारणी सुरू आहे.
या कामात विशाल शिंदे, गंगाराम आंबेकर, मयूर क्षीरसागर, योगेश सोनवणे, अमोल क्षीरसागर, शुभम भगत, अमित किर्वे, राजेश राखेचा, सौरभ सोनवणे, अर्जुन कर्पे, नीलेश बुधवारे, मयूर मखाने, सुरेश वालझाडे, राहुल काळे, नागेश भागवत, सन्नी पुणेकर, सागर सोनवणे सहकार्य करत आहे.