एक एकर टमाट्यावर तणनाशकाची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:12 IST2020-08-12T20:34:36+5:302020-08-13T00:12:56+5:30
कोकणगाव : येथील शेतकरी सीताराम तुकाराम मोरे यांच्या शेतामधील एक एकर टमाटा पिकावर अज्ञात इसमांकडून तणनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.

कोकणगाव येथे तन नाशक फवारणी केलेल्या पिकाची पाहणी करताना नागोरे, अंबादास गांगुर्डे, माणिकराव सरोदे आदी.
कोकणगाव : येथील शेतकरी सीताराम तुकाराम मोरे यांच्या शेतामधील एक एकर टमाटा पिकावर अज्ञात इसमांकडून तणनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.
मोरे यांच्या गट नंबर ७९४ असून, या शेतामध्ये टमाट्याची लागवड केली होती. तणानाशक फवारणी केल्याची ही बाब उघडकीस आली. तेव्हा पिंपळगाव पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली आहे. या पिकाकरिता चाळीस हजार रुपये खर्च झाला. जोमात आलेल्या टोमॅटो पीक पण काळाने झडप घातल्यागत तोंडी आलेला घास अज्ञात व्यक्तींनी हिरावून नेला आहे. तन नाशक फवारणी केलेल्या पिकाची पाहणी कोकणगाव येथील तलाठी नागोरे ,तसेच सरपंच अंबादास गांगुर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव सरोदे, पोलीस पाटील तुकाराम पवार, उपसरपंच जगन्नाथ मोरे, कोतवाल माणिक जाधव यांनी जागेवर येऊन पंचनामा केला आहे. पिंपळगाव येथील हवालदार पवार व निकुंभ यांनी पाहणी करून फिर्याद दाखल केली आहे.