नगरसूल परिसरात औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:09 IST2020-03-25T23:09:09+5:302020-03-25T23:09:23+5:30
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरसूल गाव व परिसरातील वाड्या-वस्ती परिसरात जंतुनाशक औषध फवारणी केली जात आहे. याबरोबरच विशेष स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत असून, गावात परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्याची विशेष काळजी घेतली जात आहे.

नगरसूल परिसरात औषध फवारणी
नगरसूल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरसूल गाव व परिसरातील वाड्या-वस्ती परिसरात जंतुनाशक औषध फवारणी केली जात आहे. याबरोबरच विशेष स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत असून, गावात परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्याची विशेष काळजी घेतली जात आहे. गावात ग्रामपंचायतीकडून लोकप्रबोधनासाठी गेल्या दोन दिवसांपासून जाहीर सूचना देणेकामी ध्वनिक्षेपक लावून गाडी फिरवण्यात येत आहे. गावसुरक्षेसाठी सरपंच प्रसाद पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरखनाथ निकम, ग्रामपंचायत कर्मचारी मनोज गाडेकर, शेखर पवार, महेश गलांडे, तेजस नागरे, भावराव मोरे आदी परिश्रम घेत आहेत.