रस्त्यांवर फिरणाऱ्यांची जागेवरच अँटिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 01:43 AM2021-04-17T01:43:24+5:302021-04-17T01:43:44+5:30

शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमधील सुपर स्प्रेडर्स शोधून काढण्यासाठी यापूर्वी संबंधित नागरिकांची उचलबांगडी करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्यात आला आहे. पोलिसांबरोबरच आता महापालिकेचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात येणार आहे. रस्त्यावर अचानक फिरणारे नागरिक आढळले की, त्यांना त्याच ठिकाणी अडवून त्यांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे.

On-the-spot antigen detection of pedestrians | रस्त्यांवर फिरणाऱ्यांची जागेवरच अँटिजन तपासणी

रस्त्यांवर फिरणाऱ्यांची जागेवरच अँटिजन तपासणी

Next
ठळक मुद्देपथक : स्प्रेडर्स रोखण्यासाठी आयुक्तांचा निर्णय

नाशिक : शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांमधील सुपर स्प्रेडर्स शोधून काढण्यासाठी यापूर्वी संबंधित नागरिकांची उचलबांगडी करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्यात आला आहे. पोलिसांबरोबरच आता महापालिकेचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात येणार आहे. रस्त्यावर अचानक फिरणारे नागरिक आढळले की, त्यांना त्याच ठिकाणी अडवून त्यांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बाधित आढळले की, त्यांना गृहविलगीकरणात राहावे लागेल; अन्यथा कोविड सेंटर्समध्ये दाखल केले जाणार आहे. 
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य नियमांचे पालन केले जात नाही, हे त्यातील मुख्य कारण असले तरी बाधित होऊनही लक्षणे नसलेले; परंतु इतरांमध्ये या संसर्गाचा फैलाव करणाऱ्यांचा मुक्त संचार सर्वाधिक अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या फेब्रुवारी- मार्च महिन्यांतच नागरिकांशी थेट संबंध येणाऱ्या महापालिका आणि बँक अधिकारी कर्मचाऱ्यांपासून रिक्षाचालक, भाजीविक्रेते, किराणा दुकानदार अशी सर्वांचीच अँटिजन चाचणी करून सुपर स्प्रेडर्स शोधण्याचा प्रयत्न केला होता. शहरातील पंचवटी कारंजा, सिडकोसह अनेक ठिकाणी महापालिका आणि पाेलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांना थेट महापालिका रुग्णालयात नेऊन कोरोना चाचण्या केल्या होत्या. त्यात अनेक सुपर स्प्रेडर्सचा शोध घेण्यात महापालिकेला यश आले होते. 
दरम्यान, आता आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्प्रेडर्सची शोधमोहीम गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता पूर्वीच्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांना अडवून त्यांना एका वाहनात बसवून रुग्णालयापर्यंत नेण्याऐवजी आता महापालिकेच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक शिक्षक, असे पथक तयार केले असून, ते पोलिसांच्या बरोबर असेल. 
रस्त्यावर फिरणारे नागरिक आढळले की, त्यांना तेथेच अडवून त्यांची अँटिजन चाचणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ करतील, तर संंबंधित नागरिकाची माहिती शिक्षक गुगलशीट आणि पोर्टलवर भरतील. त्यामुळे सुपर स्प्रेडर्सला शोधून त्यांच्यापासून अन्य नागरिकांना होणारा संसर्ग टाळण्यात येणार आहे. यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी आदेश जारी केला आहे.
स्प्रेडर्समुळे होणारा संसर्ग टळेल
महापालिकेने यापूर्वी राबवलेल्या कार्यपद्धतीत नागरिकांना पडकून एकाच वाहनातून महापालिकेच्या रुग्णालयात नेले जात असे आणि त्यानंतर चाचणी केली जात असे; परंतु एकाच वाहनातून जाताना एखाद्या सुपर स्प्रेडरमुळे अन्य नागरिकांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे कार्यपद्धतीत आयुक्तांनी बदल केला आहे. 

Web Title: On-the-spot antigen detection of pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.