छत्रे विद्यालयाच्या खेळाडूंना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:23 IST2018-01-23T00:12:41+5:302018-01-23T00:23:34+5:30
यवतमाळ येथे संपन्न झालेल्या पुरुष व महिला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय व जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी सात सुवर्णपदके मिळवीत सांघिक उपविजेतेपद पटकावले

छत्रे विद्यालयाच्या खेळाडूंना सुवर्णपदक
मनमाड : यवतमाळ येथे संपन्न झालेल्या पुरुष व महिला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय व जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी सात सुवर्णपदके मिळवीत सांघिक उपविजेतेपद पटकावले खुशाली निवृत्ती गांगुर्डे, सोनाली सुनील काळसरपे, करुणा रमेश गाढे यांनी एक, तर धनश्री नितीन पवार व निकिता वाल्मीक काळे हिने ज्युनिअर व युथ गटात दोन सुवर्णपदके प्राप्त केली. ज्युनिअरमध्ये अनामिका मच्छिंद्र शिंदे हिने दोन, तर नूतन बाबासाहेब दराडे हिने एक रौप्यपदक मिळविले. साक्षी संजय पांडे, पूजा राजेश परदेशी हिने कांस्यपदक मिळवले. अमृता भाऊसाहेब शिंदे, समीर मनसुब कुणगर, मंदार रवींद्र खालकर यांनी चमकदार कामगिरी केली. या यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापक श्रीमती के. एस. लांबोळे, क्र ीडाशिक्षक प्रवीण व्यवहारे, जयभवानी व्यायामशाळेचे जयराम सानप, मोहन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.