रब्बीच्या काढणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:23 IST2020-03-30T22:22:52+5:302020-03-30T22:23:45+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव आदी भागात सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत रब्बी पिकांच्या काढणीला वेग आला आहे.

सोशल डिस्टन्सिंग : नांदूरवैद्य येथे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करताना कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेवून गहू काढणीचे काम करताना मजूर.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव आदी भागात सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत रब्बी पिकांच्या काढणीला वेग आला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती मनात आहे, मात्र रब्बी हंगामातील हरभरा, गहू ही काढणीला आलेली पिके रानात कशी ठेवणार? अशी चिंता परिसरातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. त्यातच सततच्या वातावरण बदलामुळे अवकाळी पाऊस कधी येईल या भीतीने शेतकऱ्यांनी या रब्बी पिकांच्या काढणीस सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी मजूर मिळत नसल्याने घरच्याच माणसांद्वारे सुरुवात केली आहे.
एकीकडे मनात कोरोनाची भीती अन् दुसरीकडे कामही महत्त्वाचे. या दुधारी कात्रीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळेच की काय काही गावांतील शिवारात विशेषत: अजूनही चिटपाखरूही फिरकत नाही. अशा काही शिवारात शेतकरी राबताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. प्रशासन जनजागृतीबरोबरच रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गावागावांत कमालीचा सन्नाटा आहे. साºयांनीच स्वत:ला कोंडून घेतले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात रब्बी पिकांच्या काढणीचे काम सुरु आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने परिसरातील शेतकºयांनी गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या काढणीस सुरु वात केली आहे.