शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नाशिक- पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणास वेग

By admin | Published: October 17, 2014 11:56 PM

अडथळ्यांची शर्यत : गोंदे फाटा ते संगमनेर दरम्यान काम

सिन्नर : नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० च्या चौपदरीकरणाच्या कामास तालुक्यात वेग आला आहे. तालुक्यातील गोंदाफाट्यापासून संगमनेरकडे काम सुरु असल्याने वाहनचालकांची लवकरच अडथळ्यांच्या शर्यतीतून सुटका होणार आहे. या महामार्गाचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु करण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या उशिराच्या पावसाने रस्त्यांच्या कामात काही प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. तथापि, आता पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने रस्त्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र आहे. या रस्त्यावरील पूल, भूयारीमार्ग व नांदूरशिंगोटेजवळील बाह्यवळण रस्ता व महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरदारपणे सुरु असल्याचे चित्र आहे.एका खासगी कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे. रस्ता एका बाजूने सुरू असून, दुसऱ्या बाजूने रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. रस्त्यावरील पुलांचे बांधकाम जोरात सुरू असून, दोडी बुद्रूक येथे उड्डान पुलाच्या कामासही महिनाभरापासून सुरुवात झाली आहे. मात्र दोडी येथील अतिक्रमणे अद्याप हटविण्यात आली नाही. थोड्याच दिवसांत ही अतिक्रमणे काढली जाणार असल्याची चर्चा दोडी येथे सुरू झाली आहे. या कामासाठी काढण्यात ेयेणाऱ्या अतिक्रमित बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष अतिक्रमण मोहीम हाती घेतल्यावर अनेकजण स्वत:च हे बांधकामे हटवतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असल्याने पुढील कामास प्रारंभ करण्यात आला आहे. (वार्ताहर)