सप्तशृंग गडावर जोरदार पर्जन्यवृष्टी धबधब्याच्या नयनमनोहारी दृष्याचे सोशल मिडीयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:21 IST2020-08-17T17:18:11+5:302020-08-17T17:21:34+5:30
वणी : गेल्या दोन दिवसांपासुन सप्तशृंग गड व पर्वतरांगामधै जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे नद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे तर सखल उंच भागात सुरु असलेल्या पावसामुळे गडावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या माध्यमातुन सुरु आहेत.

सप्तशृंग गडावर जोरदार पर्जन्यवृष्टी धबधब्याच्या नयनमनोहारी दृष्याचे सोशल मिडीयावर
लोकमत न्युज नेटवर्क
वणी : गेल्या दोन दिवसांपासुन सप्तशृंग गड व पर्वतरांगामधै जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे नद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे तर सखल उंच भागात सुरु असलेल्या पावसामुळे गडावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या माध्यमातुन सुरु आहेत.
गडावरील गणेश घाटात ठिकठिकाणी धबधबे सुरु आहेत उंचवट्यावरु न वाहणारे पाणी जेव्हा जमिनीवर पडते त्यावेळी खळखळणारा आवाज हा नैसिर्गक सौंदर्याची साक्ष देतो.मात्र हे नयनमनोहारी दृष्य सोशल मिडीयाच्या माध्यमातुन निसर्गप्रेमीपर्यंत पोहचते व ही दृष्ये पाहताक्षणी निखळ आनंदाची अनुभुती होते.
सध्या गडावर प्रवेशबंदी असल्याने स्थानिक वास्तव्यास असलेल्या नागरिकांव्यतीरिक्त सहसा कोणी नजरेस पडत नाही दरम्यान गडावर सुरु असलेल्या पावसामुळे हिरवीगार वनसृष्टी व आकर्षक धबधबे हे अनुभवण्यासारखे असले तरी ते सोशल मिडीयात पाहण्यासाठी पसंती दिली जात आहे.
2 ्नह्लह्लड्डष्द्धद्वद्गठ्ठह्लह्य