उन्हाळ्याच्या सुट्टीत धावणार विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:38 IST2019-03-31T00:38:11+5:302019-03-31T00:38:31+5:30
उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागातर्फे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १०० विशेष रेल्वे धावणार आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत धावणार विशेष गाड्या
नाशिकरोड : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागातर्फे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १०० विशेष रेल्वे धावणार आहेत.
भुसावळ-मुंबई, पुणे-गोरखपूर, बनारसजवळील मंडुडीदरम्यान उन्हाळी सुट्टी निमीत्त विशेष रेल्वे गाडया धावणार असून विशेष गाड्या विशेष शुल्कावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोरखपुर सुपरफास्ट रेल्वे १२ एप्रिल ते ५ जुलै पर्यत दर सोमवारी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता गोरखपुरला पोहचेल. तसेच गाडी क्रमांक ०२०१० सुपरफास्ट साप्ताहिक विशेष रेल्वे १३ एप्रिल ते ६ जुलै पर्यत दर शनिवारी गोरखपुर येथून दुपारी २.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.४५ वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल. या रेल्वेला दादर, कल्याण, इगतपुरी, मनमाड, भुसावल, बºहाणपूर इटारसी, भोपाल, झांसी, उरई, कानपुर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा व बस्ती येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस जवळील मंडुडीह साप्ताहिक विशेष रेल्वे (गाडी नंबर ०१०२५) १७ एप्रिल ते ३ जुलैपर्यंत प्रत्येक बुधवारी रात्री ००. ४५ वाजता सुटून दुसºया दिवशी पहाटे ४.४५ वाजता मंडडीहला पोहचेल. तर मंडुडीह येथून (गाडी नंबर ०१०२६) १८ एप्रिल ते ४ जुलै पर्यंत दर गुरूवारी सकाळी ६.३० वाजता निघून दुसºया दिवशी सकाळी ७.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पहोचेल. ही रेल्वे कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, इलाहबाद एवं ज्ञानपुर थाबेल.
पुणे येथून (गाडी नंबर ०१४७५) साप्ताहिक विशेष रेल्वे ७ एप्रिल ते ३० जून पर्यंत प्रत्येक रविवारी सायंकाळी ५.५५ वाजता सुटून तिसºया दिवशी पहाटे ४.३० गोरखपुरला पोहचेल. गोरखपूर येथून (गाडी नंबर ०१४७६) ९ एप्रिल ते २ जुलै पर्यंत प्रत्येक मंगळवारी सकाळी ७.२५ सुटून तिसºया दिवशी सायंकाळी ५.०० वाजता पुण्याला पोहचेल. या रेल्वेला दौंड, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, झांसी, उरई, कानपुर, बाराबंकी, गोंडा, बस्ती येथे थांबा देण्यात आला आहे.
पुणे-मंडुडीह साप्ताहिक विशेष (गाडी क्रमांक ०१४९७) ११ एप्रिल ते २७ जून २०१९ पर्यंत प्रत्येक गुरूवारी रात्री ९.३० वाजता सुटून तिसºया दिवशी पहाटे ३.२५ वाजता मंडुडीह येथे पोहचेल. मंडुडीह येथून (गाडी क्रमांक ०१४९८) १३ एप्रिल ते २९ जून २०१९ पर्यंत शनिवार पहाटे ४.४५ वाजता सुटून तिसºया दिवशी दुपारी १२ वाजता पुण्याला पोहचेल. सदर गाडीला दौंड, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, इलाहाबाद, ज्ञानपुर येथे थांबा देण्यात आलेला आहे.
आरक्षणाची सुविधा
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस व पुणे येथून सुटणाºया उन्हाळ्याच्या सुट्टीतील विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह सर्व रेल्वे आरक्षण कार्यालय व आयआरसीटीसी वेबसाईट उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील विशेष रेल्वे गाड्यातील काही रेल्वेंना आरक्षण लागु करण्यात आलेले नसून त्यांचे तिकीट सामान्य तिकीट खिडकीवरून देण्यात येणार आहे.