परीक्षेसाठी रेल्वेच्या आज विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:24 IST2020-09-05T01:23:54+5:302020-09-05T01:24:12+5:30
नाशिकरोड : राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (एनडीए) आणि नौसेना अकादमीच्या परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेतर्फे शनिवारी (दि. ५) १२ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

परीक्षेसाठी रेल्वेच्या आज विशेष गाड्या
नाशिकरोड : राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (एनडीए) आणि नौसेना अकादमीच्या परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेतर्फे शनिवारी (दि. ५) १२ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या परीक्षार्थी व प्रवाशांना कोरोनाबाबतचे सर्व नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. सोबत आपले हॉल टिकट ठेवावे लागेल. प्रवाशांनी आरक्षण खिडकीवर किंवा आॅनलाइन तिकीट काढून प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे. या गाड्यांमध्ये भुसावळ विभागातून चालवण्यात येणाºया गाड्या पुढीलप्रमाणे- नाशिक- नागपूर गाडी ५ सप्टेंबरला नाशिकरोडहून दुपारी ४.१० वाजता सुटेल. मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या स्थानकावर ती थांबेल. नागपूरहून ही गाडी ६ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता सुटेल. मुंबई-नागपूर गाडी ५ सप्टेंबरला मुंबईहून सायंकाळी ५.१५ वाजता सुटेल. नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबेल. नागपूरहून ही गाडी रात्री ९ वाजता सुटेल. बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक येथे थांबेल.
अमरावती-नागपूर मेमू गाडी ६ सप्टेंबरला निघेल. जळगाव- नागपूर मेमू गाडी ५ सप्टेंबरला निघेल. भुसावळ, अकोला, बडनेरा येथे ती थांबेल. अकोला- नागपूर मेमू गाडी ६ सप्टेंबरला निघेल. अहमदनगर- नागपूर गाडी ५ सप्टेंबरला निघेल. ती मनमाड, भुसावळ, येथेही थांबेल. पनवेल- नागपूर गाडी ५ सप्टेंबरला पनवेलहून सुटेल. नाशिकरोड, मनमाड, भुसावळ येथे ती थांबेल. अहमदनगर- मुंबई गाडी नगरहून रात्री ९ वाजता सुटेल. मनमाड, नाशिक येथे ती थांबेल. नाशिक- मुंबई गाडी नाशिकहून रात्री ११.४५ वाजता निघेल.