धर्माबाद-मनमाडदरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:51 IST2020-10-23T22:43:08+5:302020-10-24T02:51:36+5:30
येणाऱ्या सणासुदीचा विचार करून प्रवाशांच्या सुविधेसाठी धर्माबाद – मनमाड उत्सव विशेष गाड़ी सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात आला आहे.

धर्माबाद-मनमाडदरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू
मनमाड : येणाऱ्या सणासुदीचा विचार करून प्रवाशांच्या सुविधेसाठी धर्माबाद – मनमाड उत्सव विशेष गाड़ी सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात आला आहे.
गाड़ी क्रमांक- ०७६८८ अप धर्माबाद – मनमाड विशेष गाडी दि. २४ ऑक्टोबरपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी प्रस्थान स्टेशनहून दररोज ४.०० वाजता सुटेल आणि १३.२० वाजता मनमाड स्टेशनवर पोहोचेल. गाड़ी क्रमांक ०७६८७ डाउन मनमाड - धर्माबाद विशेष गाडी दि.२४ ऑक्टोबरपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्थान स्टेशनहून दररोज १५.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ००.१० वाजता धर्माबाद स्टेशनला पोहोचेल या गाडीला करखेली, उमरी, मुद्खेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतुर, रंजानी, जालना, बदनापूर, मुकुंदवाडी हाल्ट, औरंगाबाद, लासुर, करंजगाव, रोटेगाव, अंकाई या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.