येवल्यात पावसाळापूर्व विशेष स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:13 IST2021-06-03T21:54:36+5:302021-06-04T01:13:41+5:30
येवला : शहरात नगरपालिकेच्या वतीने पावसाळापूर्व विशेष स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

येवला नगर पालिकेच्या पावसाळापूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करताना अरुण काळे. समवेत शफिक शेख, राजेंद्र लोणारी, संगीता नांदुरकर, पाटील आदी.
ठळक मुद्दे प्रत्येक वॉर्डात विशेष स्वच्छता मोहीम
येवला : शहरात नगरपालिकेच्या वतीने पावसाळापूर्व विशेष स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नगरसेवक शफिक शेख, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, मर्चंट बँक चेअरमन अरुण काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोहिमेचा शुभारंभ झाला. शहरातील प्रत्येक वॉर्डात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी उपमुख्याधिकारी पाटील, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, तसेच नगर पालिका स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.