शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'आर्ची'च्या झिंगाटने निर्भया मरेथॉनला रंगत; अजिंक्य रहाणे, जितेंद्र जोशी यांचाही विशेष सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 16:43 IST

निर्भया मॅरेथॉनच्या निमित्ताने नाशिकच्या रस्त्यावर धावलेल्या हजारो धावपटूंना रिंकूसह, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या उपस्थितीने उत्साहाला उधाण आले होते. 

ठळक मुद्देसंपूर्ण महाराष्ट्राची लाडकी ‘आर्ची’ आकर्षक साडी नेसून स्टेजवर अवतरताच सुरु झालेल्या ‘झिंगाट’वर तिने ठेका धरला आणि संपूर्ण मैदानातच त्या नृत्याची झिंग पसरली.अर्ध मॅरेथॉनमध्ये महिलांच्या 18 ते 29  गटात आरती देशमुख आणि शीतल भंडारी यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय , 30 ते 39 गटात असा टी. पी.,ज्योती गवते, निवृत्ता दहावड आणि माधुरी काळे यांनी बाजी मारली.

नाशिक : काम कोणतेही करीत असला तरी शिक्षण आणि नवनवीन गोष्टी शिकणो सोडू नका, मी पण सोडलेले नाही. शिक्षणातूनच महिलांना ख-या अर्थाने पुढे जाण्याचे मार्ग गवसणार आहेत, अशा शब्दात सर्वाची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिने उपस्थित महिला आणि मुलींसमोर शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी ‘आर्ची’ आकर्षक साडी नेसून स्टेजवर अवतरताच सुरु झालेल्या ‘झिंगाट’वर तिने ठेका धरला आणि संपूर्ण मैदानातच त्या नृत्याची झिंग पसरली. निर्भया मॅरेथॉनच्या निमित्ताने नाशिकच्या रस्त्यावर धावलेल्या हजारो धावपटूंना रिंकूसह, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या उपस्थितीने उत्साहाला उधाण आले होते. येथील ठक्कर डोम मैदानावर रविवारी सकाळी निर्भया मॅरेथॉनला प्रारंभ झाला.  21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा टप्प्याटप्प्याने धावपटूंना सोडण्यात आले.

नाशिक पोलीसांच्या वतीने आयोजित या निर्भया मॅरेथॉनच्या शुभारंभप्रसंगी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आयोजक आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, औरंगाबादचे डीआयजी आणि नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक आरतीसिंह यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा मॅरेथॉन सोहळा उत्साहात पार पडला. 

अर्ध मॅरेथॉनचे विजेते अर्ध मॅरेथॉनमध्ये महिलांच्या 18 ते 29  गटात आरती देशमुख आणि शीतल भंडारी यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय , 30 ते 39 गटात असा टी. पी.,ज्योती गवते, निवृत्ता दहावड आणि माधुरी काळे यांनी बाजी मारली. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये बबन चव्हाण,विनोद वळवी आणि सोनू नवरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तर 30 ते 39 गटात विनायक ढोबळे, चंदर सिंग आणि बालाजी कांबळे यांनी बाजी मारली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

टॅग्स :Rinku Rajguruरिंकू राजगुरूNashikनाशिकPoliceपोलिस