मानोरी येथे विशेष स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:12 IST2020-04-01T23:12:05+5:302020-04-01T23:12:31+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत आहे, तसेच जंतुनाशक औषध फवारणीसह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Special cleaning campaign at Manori | मानोरी येथे विशेष स्वच्छता अभियान

मानोरी येथे जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम राबविताना नंदाराम शेळके, पोपट शेळके, राजेंद्र शेळके आदी.

मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत आहे, तसेच जंतुनाशक औषध फवारणीसह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गावात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जागेवर जेसीबीच्या साहाय्याने काटेरी झुडपे, गबळ, दगड - गोटे काढून स्वच्छता करण्यात आली. तसेच अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसरदेखील स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला. यावेळी सरपंच नंदाराम शेळके यांनी ग्रामस्थांना खबरदारी घेण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे, पोपट शेळके, शिपाई तुकाराम शेळके, राजेंद्र शेळके, शरद वाघ, जगन शेळके, रामकीसन साठे, पंकज खैरनार, योगेश साळवे आदी उपस्थित होते.

Web Title: Special cleaning campaign at Manori