सभापती सेनेचाच

By Admin | Updated: March 28, 2017 01:10 IST2017-03-28T01:10:07+5:302017-03-28T01:10:34+5:30

सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, यंदाच्या मनपा निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे सिडको प्रभाग सभापतिपदी हा सेनेचाच होणार आहे.

Speaker Seachachch | सभापती सेनेचाच

सभापती सेनेचाच

सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, यंदाच्या मनपा निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे सिडको प्रभाग सभापतिपदी हा सेनेचाच होणार आहे. परंतु स्थायी समितीवर ज्या सदस्यांची निवड केली जाईल त्यांना वगळून इतर सदस्यांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  सिडको प्रभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८, २९ आदिंचा समावेश आहे. या सहा प्रभागातील २४ नगरसेवकांमध्ये सेनेचे १५,भाजपा ८ व राष्ट्रवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सेनेच्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर, प्रवीण तिदमे, दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, भागवत आरोटे, चंद्रकांत खाडे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, हर्षा गायकर, किरण गामणे आदिंचा समावेश आहे. तर भाजपाच्या नगरसेवकांमध्ये अलका अहिरे, छाया देवांग, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, मुकेश शहाणे, नितीन ठाकरे, राकेश दोंदे आदिंचा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले असे पक्षीय बलाबल आहे.  सिडको प्रभागात सेना (पंधरा) पाठोपाठ भाजपा (आठ) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत सिडको प्रभागात भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठ्या प्रमाणात बाजी मारली आहे. मागील निवडणुकीत नाशिक मनपामध्ये सत्ता असलेल्या मनसेचा सिडको प्रभागात आठ नगरसेवक होते. यंदा मात्र एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. तर कॉँग्रेस, माकपादेखील हद्दपार झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित असून, स्थायी समितीवर ज्या सदस्यांची वर्णी लागणार त्या व्यतिरिक्त असलेल्या सदस्यांपैकी एका सदस्याची सिडको प्रभाग सभापती होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: Speaker Seachachch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.