देवळा तालुक्यात पेरणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:57 IST2020-06-10T21:55:31+5:302020-06-11T00:57:50+5:30
भऊर : देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ परिसरात पेरणीच्या कामांनी वेग घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. निसर्गचक्री वादळानंतर सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरू आहे.

देवळा तालुक्यात पेरणीला वेग
भऊर : देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ परिसरात पेरणीच्या कामांनी वेग घेतल्याचे
चित्र दिसून येत आहे. निसर्गचक्री वादळानंतर सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरू आहे.
या परिसरात दरवर्षी शेतकरी मका, बाजरी, भुईमूग, कोथिंबीर, मूग आदी पिकांची पेरणी करून पावसाळी लाल कांदे, कोबी या पिकांचीही लागवड करतात. गतवर्षी मका पिकावर लष्करी अळीने थैमान घातले होते. त्यामुळे चालूवर्षी या परिसरात मका उत्पादकांनी पारंपरिक मका पिकाला फाटा देत सोयाबीन व ताग पिकाला प्राधान्य दिले आहे. काही ठिकाणी जनावरांच्या चाºयाला पर्याय नाही म्हणून नाइलाजास्तव मक्याची पेरणी करत आहेत.
कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने शेतकऱ्यांना कुठलाही शेतमाल विक्र ी करता आला नाही. परिसरात
टमाटा, मिरची पिके झाडांवर लाल होऊन सडली. यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊन त्यांच्या हातात पैसा नसताना सध्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली बियाणे खरेदी करून पेरणी करण्याची वेळ आली आहे.
---------------------
बियाणांच्या किमती वाढल्याने नाराजी
४ मका, कांदा बियाणांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकºयांमधून नाराजीची भावना व्यक्त केली जात आहे. सध्या बाजारात मका पिकाला १२ ते १३ रु पये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असताना मका बियाणे मात्र ३०० ते ३५० रु पये प्रतिकिलो भावाने विक्र ी होताना दिसून येत आहे. पावसाळी लाल कांद्याच्या बियाणातही कंपन्यांनी भरमसाठ वाढ करून दरवर्षी १२०० ते १५०० रु पये प्रतिकिलो मिळणारे बियाणे चालूवर्षी
२००० ते २४०० रु पये प्रतिकिलोप्रमाणे विक्र ी होत आहे.