पिंपळगाव येथे ‘दार उघड उद्धवा दार उघड’चा नाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:33 PM2020-08-29T17:33:52+5:302020-08-29T17:34:38+5:30

पिंपळगाव बसवंत : कोरोनामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कुलूप बंद आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या आराध्य देवतांचे दर्शन घेणे, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या अल्पसंख्याक प्रदेश मोर्चाचे चिटणीस आल्पेश पारख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर ’दार उघड उद्धवा दार उघड ’ अशी हाक देत शनिवारी (दि.??) घंटानाद आंदोलन करण्यात आले.

The sound of 'Open the door, open the door' at Pimpalgaon | पिंपळगाव येथे ‘दार उघड उद्धवा दार उघड’चा नाद

पिंपळगावी घंटा नाद आंदोलन करताना आल्पेश पारख, प्रशांत घोडके, संदीप झुटे, मयूर गावडे आदी. 

Next
ठळक मुद्देपिंपळगावी भारतीय जनता पार्टीच्या दोन गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पिंपळगाव बसवंत : कोरोनामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कुलूप बंद आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या आराध्य देवतांचे दर्शन घेणे, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या अल्पसंख्याक प्रदेश मोर्चाचे चिटणीस आल्पेश पारख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर ’दार उघड उद्धवा दार उघड ’ अशी हाक देत शनिवारी (दि.??) घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशांत घोडके, मयूर गावडे, संदीप झुटे, रविराज जाधव, महेंद्र ठाकरे, अर्जुन वाघले, दत्तू काळे, लखन शिंदे, जगन्नाथ निळकंठ, कुसुम नीलकंठ, गौरव पंडित,चेतन मोरे आदीसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शहरात भाजपाचे अंतर्गत वादामुळे दोन गट निर्माण झाले असून शनिवारी एका गटाने घंटानाद आंदोलन केले तर दुसर्या गटाने आंदोलन करणार नसल्याचे पत्र पिंपळगाव पोलीस स्टेशनला दिल्याने पिंपळगावी भारतीय जनता पार्टीच्या दोन गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: The sound of 'Open the door, open the door' at Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.