अत्याधुनिक रुग्णवाहिका

By Admin | Updated: June 30, 2014 01:28 IST2014-06-30T01:20:04+5:302014-06-30T01:28:18+5:30

अत्याधुनिक रुग्णवाहिका

Sophisticated ambulance | अत्याधुनिक रुग्णवाहिका

अत्याधुनिक रुग्णवाहिका

सप्तशृंगगड : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर भाविकांच्या सेवेसाठी भारत विकास ग्रुप, पुणे यांच्यासह महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसतर्फे जर्मन अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने नवीन अशी अत्याधुनिक रुग्णवाहिका सप्तशृंगगडावर आज दाखल झाली. या रुग्णवाहिकेचा शुभारंभ धर्मार्थ रुग्णालयात भारत विकास ग्रुपचे नाशिक सर्कलचे आॅपरेशन हेड बाळासाहेब ककाळे, मॅनेजर श्रीकांत आम्बे, संस्थानचे वनारसे देशमुख, गावचे सरपंच जीवन पवार, पो.पाटील शशिकांत बेनके, वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील, बाळासाहेब निकम आदिंसह ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे टोल फ्री १0८ या क्रमांकावर संपर्क साधल्यावर अवघ्या काही मिनिटांत रुग्णांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे. मोठ्या दवाखान्यात रुग्णांना पोहोचविण्याकरिता रुग्णाला कुठल्याही प्रकारचे शुल्क अदा करण्याची गरज नाही. या गाडीचा खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे.
१0८ या नंबरला कॉल केल्यानंतर आपणास आपत्कालीन घटनेसाठी या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. रोड अ‍ॅक्सिडेंट, क्रिटीकल प्रेग्नट वुमन, नवजातसंबंधी आजार, सर्पदंश, विषबाधा, जळीत पेशंट व इतर इमर्जन्सी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच या गाडीसोबत तीन वैद्यकीय अधिकारी असणार आहेत.
या शुभारंभासाठी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कार्यालयप्रमुख प्रकाश पगार, ग्रा.पं. सदस्य संदीप बेनके, संतोष चव्हाण, काकळीज ग्रामस्थ गिरीश गवळी, अनिल सताळे, विठ्ठल जाधव, मयूर बेनके, शांताराम बेनके, आनंद वाघ, सचिन पैठणकर, पंकज पाटील आदि उपस्थित होते.
या गाडीचा सर्व भाविकांना, ग्रामस्थांना लाभ होणार असून, गरीब किंवा श्रीमंत कोणाकडूनही गाडीचे शुल्क घेणार नसून या गाडीमध्ये मोफत महिलांची प्रसूती केली जाते. तसेच सर्पदंश झाल्यास एक इंजेक्शन दिल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात अशा प्रकारची सुविधा असून, अशा प्रकारची सुविधा सर्व देवस्थानांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, याचा सर्वांनी उपयोग करून द्यावा.

Web Title: Sophisticated ambulance