रामपूर सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वायकर

By Admin | Updated: May 6, 2017 22:56 IST2017-05-06T22:56:09+5:302017-05-06T22:56:22+5:30

सिन्नर : रामपूर (पुतळेवाडी) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सोपान मच्छिंद्र वायकर तर उपाध्यक्षपदी गोकुळ नारायण नरोडे यांची निवड झाली.

Sopan Wiaker as Rampur Society's President | रामपूर सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वायकर

रामपूर सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वायकर

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी चुरस दिसून आली. दोन्ही पदासाठी उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पध्दतीने निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सोपान मच्छिंद्र वायकर तर उपाध्यक्षपदी गोकुळ नारायण नरोडे यांची निवड झाली.
संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली होती. १३ पैकी संचालक मंडळाच्या १२ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. एक जागा रिक्त राहिली होती. संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेश सभा बोलविण्यात आली होती.
अध्यक्षपदासाठी सोपान वायकर व सुधाकर नरोडे तर उपाध्यक्षपदासाठी गोकुळ नरोडे व नवनाथ नरोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत कोणीही माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी वायकर व नरोडे यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोकुळ नरोडे व
नवनाथ नरोडे यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. त्यामुळे दोन्ही पदासाठी चिठ्ठी काढून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदाची चिठ्ठी सोपान वायकर तर उपाध्यक्षपदाची चिठ्ठी गोकुुळ नरोडे यांची निघाली. त्यामुळे अध्यक्षपदी सोपान वायकर तर उपाध्यक्षपदी गोकूळ नरोडे यांच्या निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी कासार यांनी केली. सचिव सुनील कासार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सहाय्य केले.
यावेळी संजय नवले, शुक्लेश्वर नरोडे, कल्याबाई डेंगळे, हिराबाई नवले, संतोष खैरनार, रवींद्र खैरनार, उत्तम खैरनार, संजय धारणकर यांच्या सर्व संचालक बैठकीस उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भास्कर नवले, अण्णासाहेब जाधव, साहेबराव खैरनार, संदीप खैरनार, संभाजी नवले, नामदेव नवले, दशरथ खैरनार, गोकुळ पवार, विठ्ठल नवले, आप्पा झिंर्जुडे, भानुदास खिल्लारे, विजय कवडे यांच्यासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Sopan Wiaker as Rampur Society's President