पाऊस सुरू होताच पुन्हा वाहनांची घसरगुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:42 IST2021-07-12T18:41:42+5:302021-07-12T18:42:28+5:30
लखमापूर : दिंडोरी - नाशिक हा रस्ता पावसाळ्यात मुख्य चर्चेचा विषय बनला आहे तो गाड्याची घसरगुंडीमुळे. दिंडोरी तालुक्यात जवळजवळ एक महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आणि दिंडोरी - नाशिक रस्त्यावर वाहनांच्या घसरगुंडीला पुन्हा सुरुवात झाली.

पाऊस सुरू होताच पुन्हा वाहनांची घसरगुंडी
लखमापूर : दिंडोरी - नाशिक हा रस्ता पावसाळ्यात मुख्य चर्चेचा विषय बनला आहे तो गाड्याची घसरगुंडीमुळे. दिंडोरी तालुक्यात जवळजवळ एक महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आणि दिंडोरी - नाशिक रस्त्यावर वाहनांच्या घसरगुंडीला पुन्हा सुरुवात झाली.
सध्या लखमापूरफाटा ते अक्राळे फाट्यापर्यंत पावसाळ्यात वाहनांच्या घसरगुंडीमुळे जागोजागी गतिरोधक बसविले आहेत. त्यामुळे गाड्यांच्या वेगावर नियंत्रण आले होते. पण पाऊस नसतांना गाड्या सरळ निघून जातात. थोडा जरी पाऊस झाला की, गाड्यांच्या घसरगुंडीचे प्रमाण परत वाढते. आतापर्यंत जवळजवळ ३० ते ४० छोट्या, मोठ्या वाहनांचे अपघात झाले आहेत. अनेक वाहनचालक जखमी झाले होते. रस्ता अतिशय गुळगुळीत झाल्याने गाडीचा ब्रेक थोडा जरी दाबला तर लगेच गाडी बाजूला नागमोडी वळण घेऊन पलटी होते. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.
ठोस उपाययोजनांची मागणी
लखमापूर फाटा ते अक्राळे फाटा हा रस्ता अत्यंत गुळगुळीत झाल्याने पावसाळ्यात गाड्या घसरगुंडीचे प्रमाण वाढले आहे. संबंधित खात्याने या रस्त्यावर गतिरोधक बसविले. त्याने तात्पुरता फरक पडतो. पण पावसाचे प्रमाण वाढले की, परत गाड्या घसरगुंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. संबंधित खात्याने काही ठोस उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.
फोटो- १२ दिंडोरी रेन