शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

टीका होताच सत्ताधाऱ्यांचा  नवीन वाहनांचा अट्टाहास मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:32 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही आयुक्तांसाठी नवीन वाहनाची खरेदी केली जात असल्याचे पाहून स्वत:साठी सहा वाहने खरेदी करण्याच्या पावित्र्यात असलेल्या महापालिकेच्या कारभाºयांविरुद्ध जनमानसात टीकेची झोड उठताच नवीन वाहन खरेदीचा अट्टाहास सोडून देण्यात आला आहे.

नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही आयुक्तांसाठी नवीन वाहनाची खरेदी केली जात असल्याचे पाहून स्वत:साठी सहा वाहने खरेदी करण्याच्या पावित्र्यात असलेल्या महापालिकेच्या कारभाºयांविरुद्ध जनमानसात टीकेची झोड उठताच नवीन वाहन खरेदीचा अट्टाहास सोडून देण्यात आला आहे. भाजपाच्या एका गटाने या खरेदीला विरोध दर्शविल्यामुळे आता पदाधिकाºयांनीच ‘आम्हाला नवीन वाहन नको’ असे पत्र प्रशासनाला धाडल्यामुळे महापालिकेचे सव्वा कोटी रुपयांचा वाचला आहे. त्यामुळे आता फक्त महापालिका आयुक्तांसाठीच नवीन वाहन खरेदी करण्यात येणार आहे.महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी असलेली टोयोटा कोरोला ही जुनी झाल्यामुळे काही महिन्यांपासून नादुरुस्त असून, त्यावर येणारा देखभाल व दुरुस्ती खर्च पाहता, त्यापेक्षा नवीन वाहन घेणे सोयीचे ठरेल, असा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून प्रशासनाने स्थायी समितीवर महापालिका आयुक्तांसाठी नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे पाहून आपल्यालाही नवीन वाहन हवे, असा अट्टाहास एका पदाधिकाºयाने धरला व स्थायी समितीवर प्रस्ताव ठेवून दोन इनोव्हा कार खरेदीची मान्यता मिळविली. महापालिकेच्या इतर पदाधिकाºयांच्या लक्षात हा प्रकार येताच, त्यांनीही नगरसेवकांचे ठराव घेऊन उपसूचनेच्या आधारे स्वत:साठी नवीन वाहन खरेदीचा आग्रह धरल्यामुळे महापालिकेने सहा इनोव्हा कार खरेदीचा घाट घालण्यात आला. मुळात मनपाची आर्थिकस्थिती बेताची असून, तिजोरीत खडखडाट असताना मनपाच्या कारभाºयांनीच तिजोरीची चालविलेल्या लुटीवर करदात्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यातच महापौर, उपमहापौर यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा कालावधी पूर्ण होण्यास काही महिने शिल्लक असून, पुढच्या महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होणार आहे. त्याकाळात सर्वच पदाधिकाºयांना आपली शासकीय वाहने जमा करावी लागणार आहे ही वस्तुस्थिती भाजपाच्याच एका गटाने निदर्शनास आणून दिल्यानंतर नवीन वाहनाचा अट्टाहास धरणाºया पदाधिकाºयांनी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चोवीस तासांत घूमजाव केले आहे. ‘आम्हाला नवीन वाहन नकोत’, असे पत्र प्रशासनाला देऊन टीकेचे धनी होण्यास नकार दिला, तर काही पदाधिकाºयांनी आपण नवीन वाहनाची मागणीच केली नसल्याचा आश्चर्यकारक पवित्रा घेतला आहे.महापालिकेच्या तिजोरीतील स्थितीचे भान असल्यामुळेच नवीन वाहन घेण्यासाठी आपण लेखी किंवा तोंडी मागणी केलेली नाही. शहरात अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असताना अशाप्रकारे नवीन वाहन खरेदी करण्याचा बालहट्ट कोणी केला हे आपणास माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहरात ‘अच्छे दिन’ नेमके कोणाला आले? असा प्रश्न यानिमित्ताने पडला असून, ठरावात उपसूचना घुसवून नवीन वाहने घेऊन ‘अच्छे दिन’ आणण्याचा प्रयत्न सत्ताधाºयांनी केला आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांना नवीन वाहनाची इतकीच गरज असेल तर आपण आपले वाहन देण्यास तयार आहोत.-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेताआता म्हणतात नवीन वाहन नकोमहापौर रंजना भानसी सध्या वापरत असलेले वाहन चार वर्षांपूर्वी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या काळात घेण्यात आले असून, त्यानंतर काही पदाधिकाºयांसाठी दीड वर्षांपूर्वीच नवीन वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. असे असतानाही नाशिककरांच्या कर रूपातून जमा झालेल्या महसुलातून सुमारे सव्वा कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यास पदाधिकारी सरसावले होते. आता मात्र त्यांनी स्वत:हूनच ‘नवीन वाहन नको’ असे म्हटल्यामुळे ‘होऊ द्या खर्चाला’ लगाम बसला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक