सुतार-लोहार समाज संघटनेची लवकरच समन्वय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:17 IST2021-09-11T04:17:23+5:302021-09-11T04:17:23+5:30

अखिल महाराष्ट्र सुतार-लोहार संघटनेची राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष सुदामअण्णा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही माहिती ...

Soon the Coordinating Committee of the Carpenters' Association | सुतार-लोहार समाज संघटनेची लवकरच समन्वय समिती

सुतार-लोहार समाज संघटनेची लवकरच समन्वय समिती

अखिल महाराष्ट्र सुतार-लोहार संघटनेची राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष सुदामअण्णा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. समाजाचे कार्य वाढविण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करण्याचे ठरविण्यात आले.

प्रदेश सरचिटणीस नानासाहेब खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीस अखिल महाराष्ट्र सुतार-लोहार संघटनेचे माजी राज्य कार्याध्यक्ष भिकाजी जगताप, राज्य कार्याध्यक्ष पी. बी. सोनवणे, राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, अशोक पगार, जयसिंगराव वाघचौरे, संतोष मिस्त्री, राजाभाऊ शिरसाठ, मराठवाड्याचे जयवंत गाडेकर, किशोर शेलार, बबनराव पवार, राजू सालपे, लहू सुतार, नाशिक येथील रमेश गाडेकर, जिल्हाध्यक्ष गोपाळ कुंवर, दीपक खैरनार यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Soon the Coordinating Committee of the Carpenters' Association