शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

ब्रेक फेल होताच पुढील पोलीस वाहनावर बस जाऊन आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 18:26 IST

महामंडळाच्या बसेसचे वारंवार ब्रेक निकामी होण्याच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकुठल्याहीप्रकारची जीवीतहानी झाली नाहीबसचालक सुभाष रामू देवकर यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा

नाशिक : त्र्यंबकनाका येथून सीबीएसमार्गे पंचवटीमध्ये जाणाऱ्या एका शहर बसचे अचानकपणे ब्रेक बुधवारी (दि.२३) निकामी झाले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने पुढील कारला जोरदार धडक दिली. या धडकेने कार त्यापुढे असलेल्या पोलिसांच्या श्वानपथकाच्या वाहनावर जाऊन आदळले. सुदैवाने या अपघातात कुठल्याहीप्रकारची जीवीतहानी झाली नाही; मात्र बससह दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. महामंडळाच्या बसेसचे वारंवार ब्रेक निकामी होण्याच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, पंचवटी आगाराची जुन्या शहर बसचे (एम.एच४० एन९४१५) ब्रेक निकामी झाले. त्यामुळे बसचालकाचा ताबा सुटला बस वेगात असल्यामुळे थेट रस्त्यावरील पुढे असलेल्या महिंद्र टीयूव्ही कारवर (एम.एच.१५ईएक्स ७८७९) जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की धक्क्याने ही कार त्यापुढे असलेल्या बॉम्ब-शोधक नाशक पथकाच्या डॉगव्हॅनवर (एम.एच१५ एबी ११६) जाऊन आदळली. या अपघातात तीनही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने बसमध्ये प्रवाशी कमी होते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. या विचित्रप्रकारच्या अपघातामुळे त्र्यंबकनाका परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सकाळच्या वेळेस कार्यालयांमध्ये पोहचणाºया नोकरदारांनी आपली वाहने थांबवून अपघातस्थळी धाव घेतल्याने गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका, सरकारवाडा पोलिसांसह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यावेळी कारचालक रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार, बसचालक सुभाष रामू देवकर यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी सातभाई हे करीत आहेत.त्र्यंबकनाक्यावर यापुर्वी असाच अपघातत्र्यंबकनाका येथे यापुर्वीही ठाणे बसला अशाच पध्दतीचा अपघात झाला होता. महामंडळाच्या बसेससच्या देखभालदुरूस्तीचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. एकीकडे बसेसच्या फेºया महामंडळाकडून शहरात रद्द केल्या जात आहे; तर दुसरीकडे ज्या बसेस रस्त्यावर धावताहेत त्यांच्याही देखभालीबाबत कानाडोळा केला जात असल्याने नाशिक करांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.---

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात