चोरी उघडकीस आली म्हणून पोलीस पुत्राची आत्महत्त्या

By Admin | Updated: February 12, 2017 23:50 IST2017-02-12T23:49:53+5:302017-02-12T23:50:07+5:30

चोरी उघडकीस आली म्हणून पोलीस पुत्राची आत्महत्त्या

The son's suicide in the police as the theft came to light | चोरी उघडकीस आली म्हणून पोलीस पुत्राची आत्महत्त्या

चोरी उघडकीस आली म्हणून पोलीस पुत्राची आत्महत्त्या

सटाणा : दुचाकी चोरी उघडकीस आल्याने घाबरून जाऊन बावीस वर्षाच्या पोलीस पुत्राने सटाणा शहरातील जिजामाता उद्यान लगत आलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले. हा युवक साक्री येथील रहिवासी होता.
अविनाश रवींद्र पवार (२२) हा आपल्या कुटुंबीयांसह साक्री (जि.धुळे) येथे राहतो. त्याने आपल्या दोन मित्रांसह गुरुवारी गावातीलच ओळखीच्या व्यक्तीची टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल चोरी केली होती. पोलिसांनी बारा तासांच्या आत दोघा चोरट्यांना गजाआड करून मोटारसायकल चोरल्याची कबुली देऊन मोटारसायकल अविनाशजवळ असल्याचे निष्पन्न झाले. ही चोरी उघडकीस येऊन आपली व कुटुंबाची बदनामी होईल यामुळे घाबरून अविनाशने सटाणा येथील जिजामाता उद्यानाजवळ आरम नदीपात्रालगत असलेल्या शेवग्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याचे वडील व नंदुरबार पोलिसात नोकरीला असलेले रवींद्र पवार यांचे निधन झाले.

Web Title: The son's suicide in the police as the theft came to light