शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

जामीनावर असलेल्या सोनिया, राहुल यांना मोदींविषयी बोलण्याचा अधिकार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 9:31 PM

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे जामिनावर सुटलेले लोक आहेत. त्यांना पंतप्रधानांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही, असे वक्तव्य संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी (दि.१२) नाशिक येथे केले.

ठळक मुद्देराहुल, सोनिया नॅशनल हॅरॉल्ड प्रकरणात जामिनावरत्यांना मोदींविषयी बोलण्याचा अधिकारच नाही केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचे नाशकात वक्तव्य

नाशिक : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे जामिनावर सुटलेले लोक आहेत. त्यांना पंतप्रधानांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही, असे वक्तव्य संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी (दि.१२) नाशिक येथे केले.राहुल गांधी यांच्यावर आरएसएसच्या बदनामी केलाचा आरोप असून, या प्रकरणात भिवंडी येथील न्यायालयात ते हजर झाले असल्याविषयी डॉ. भामरे यांना विचारले असता राहुल गांधी आणि सोनिया गांधी नॅशनल हॅरॉल्ड प्रकरणात जामिनावर असून, त्यांना आरएसएस आणि मोदींविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचे विधान केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचे पत्र संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोप कार्यक्रमात केला होता. त्यानंतर देशभरात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या जिवाला धोका असल्याच्या पत्राविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. याविषयी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून, त्यांच्या जिवाला धोका असल्याचे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे, ती राजकीय असून अशी चर्चा योग्य नसल्याचे सांगतानाच पंतप्रधानांना धोका असल्याचे इनपूट पोलिसांचे नव्हे, तर इंटेलिजन्स विभागाचे आहे. ही सर्वच माहिती शेअर करता येत नाही. त्यामुळे विरोधक जे बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही भामरे म्हणाले.