सटाणा उत्तर सोसायटीच्या सभापतिपदी सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 18:33 IST2019-06-14T18:32:41+5:302019-06-14T18:33:05+5:30
सटाणा उत्तर भाग विकास कार्यकारी सोसायटीच्या सभापतिपदी अशोक मोतीराम सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.

सटाणा उत्तर भाग सोसायटीचे सभापति अशोक मोतीराम सोनवणे यांचा सत्कार करतांना माधव सोनवणे़ समवेत नगरसेवक दिनकर सोनवणे, साहेबराव सोनवणे, विशाल सोनवणे, सुशीला रौंदळ आदी.
सटाणा : येथील सटाणा उत्तर भाग विकास कार्यकारी सोसायटीच्या सभापतिपदी अशोक मोतीराम सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.
सभापती विमलबाई सोनवणे यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने शुक्रवारी सहायक निबंधक कार्यालय येथे सहायक निबंधक व निवडणूक अधिकारी महेश भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभापती पदासाठी निर्धारित वेळेत अशोक सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी भडांगे यांनी सभापतिपदी सोनवणे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी संचालक माधव सोनवणे यांनी नवनिर्वाचित सभापती अशोक सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. निवडी नंतर सभापती व सर्व संचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सटाणा उत्तर भाग विकास कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात सभापती सोनवणे यांनी कार्यभार स्वीकारला .