सोनसाखळी चोरटे शहरात पुन्हा सक्रिय

By Admin | Updated: June 7, 2016 07:35 IST2016-06-06T22:58:51+5:302016-06-07T07:35:41+5:30

एकाच दिवसात दोन घटना

Sonasakhaal thieves re-activate in the city | सोनसाखळी चोरटे शहरात पुन्हा सक्रिय

सोनसाखळी चोरटे शहरात पुन्हा सक्रिय

 नाशिक : शहरात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, शनिवारी (दि़४) आडगाव व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत़
सोनसाखळी चोरीची पहिली घटना के. के.वाघ महाविद्यालयाजवळील परिसरात घडली़ कमल किसन कुलपेर (६५) या शनिवारी सव्वा वाजेच्या सुमारास घरासमोरून पायी जात असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत खेचून फरार झाले़ याप्रकरणी कुलपेर यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरी घटना शरणपूर रोडवर शनिवारी (दि़४) दुपारच्या सुमारास घडली़ आद्रिंया चर्चजवळ राहणाऱ्या सारा अनिल भारस्कल (५०) या दुपारी बारा वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नरवरील हॉटेल फ्रंट पेजसमोरून पायी जात होत्या़ त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३२ हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी सुरू केलेल्या कोम्बिंग, आॅलआॅउटमुळे या घटना काही दिवसांपासून बंद होत्या़ मात्र, सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Sonasakhaal thieves re-activate in the city