इगतपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सोमनाथ जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:54 IST2021-01-13T17:53:08+5:302021-01-13T17:54:02+5:30
घोटी : इगतपुरी तालुका पंचायत समितीच्या सभापती जया कचरे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या बैठकीत नवीन सभापतीपदासाठी बुधवारी (दि. १३) शिवसेनेचे सोमनाथ जोशी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी घोषित केले. सदर निवड घोषित होताच सभागृहाबाहेर जल्लोष करण्यात आला.

इगतपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सोमनाथ जोशी
इगतपुरी पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली. सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या बैठकीत नांदगाव बु. गणातील शिवसेनेचे सदस्य जोशी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची निवड घोषित करण्यात आली. यावेळी सभागृहात मावळत्या सभापती कचरे, पंचायत समिती सदस्य भगवान आडोळे, विठ्ठल लंगडे, अण्णासाहेब पवार, कल्पना हिंदोळे, विमल तोकडे, जिजाबाई नाठे, विमल गाढवे यांच्यासह गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक बीडीओ भरत वेंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी सभापती डुकरे, बाजार समितीचे माजी सभापती संपत काळे, कृउबा संचालक, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष साहेबराव जाधव, नामदेव गाढवे, पांडुरंग झोले, रमेश धांडे, घोटीचे उपसरपंच रामदास भोर, संजय आरोटे, नंदलाल भागडे, श्रीकांत काळे, अर्जुन भोर, बाळा गव्हाणे, मोहन ब-हे, अनिल भोपे, मथुरा जाधव, संपत डावखर, नामदेव खोकले, केरू पा देवकर, डॉ. श्रीराम लहामटे, सतीश गव्हाणे, अशोक सुरुडे, हनुमंता गायकवाड, गणेश काळे आदी उपस्थित होते.