चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडल्याने समाधान

By Admin | Updated: August 2, 2016 00:52 IST2016-08-02T00:52:05+5:302016-08-02T00:52:15+5:30

चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडल्याने समाधान

The solution, due to leaving the Floor of Right to the right bank of Chandakpur | चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडल्याने समाधान

चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडल्याने समाधान

 पिंपळगाव वाखारी : चणकापूर उजव्या कालव्याच्या वाढीव कालव्यास रामेश्वर टँकपासून पूरपाणी सोडल्याने देवळा तालुक्याच्या पूर्वभागातून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पूर्वभागासाठी कालव्याद्वारे जास्तीत जास्त पूरपाणी उपलब्ध करून दुष्काळी झळा दूर करण्याची मागणी पूर्वभागातून होत आहे.
चणकापूर उजव्या कालव्यातून पूरपाणी देवळा तालुक्याच्या पूर्वभागास सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार उमराणा, दहिवड, मेशी, पिंपळगाव, वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, गुंजाळनगर, मकरंदवाडी या गावातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा अहेर यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. पाटबंधारे विभागाने त्यानुसार कार्यवाही करून पाणी कालव्यातून सोडले असले तरी त्याची चोरी होऊ नये म्हणून चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. कालव्यातून पाणीचोरी झाल्यास उमराणेपर्यंत पाणी पोहोचणे अशक्य आहे. त्यासाठी ठरलेल्या नियोजनानुसार पाटबंधारे विभागाने पाणीवाटप करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The solution, due to leaving the Floor of Right to the right bank of Chandakpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.