मालेगावी देशी दारूचा साठा जप्त

By Admin | Updated: May 6, 2017 01:01 IST2017-05-06T00:45:42+5:302017-05-06T01:01:03+5:30

मालेगाव : शहरात अवैधरीत्या मद्यविक्री करण्याच्या हेतूने वाहनात दोन लाख २४ हजार रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे

Soldiers of Malegaon country liquor seized | मालेगावी देशी दारूचा साठा जप्त

मालेगावी देशी दारूचा साठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरात अवैधरीत्या मद्यविक्री करण्याच्या हेतूने वाहनात दोन लाख २४ हजार रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दारू व वाहन असा तीन लाख ७४ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैधरीत्या मद्याचा पुरवठा होत आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. नाशिकहून येणाऱ्या वाहनातून
(क्र. एमएच ४१ एजी ६०१४) देशी दारूच्या बाटल्यांची खोकी येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास येथील संगमेश्वर भागातील महादेव मंदिराजवळ पोलिसांनी सापळा रचला होता.
सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रत्येकी ४८ बाटल्या असलेली (रु. १ लाख ८९ हजार ६६० रुपये) ८७ खोकी, तर प्रत्येकी शंभर बाटल्या असलेली (३४ हजार ३५० रुपये) १५ खोकी आढळून आली.
पोलिसांनी वाहनचालक राजेश महादू सावंत (२६), रा. स्वप्नपूर्तीनगर; अनिल सहादू चव्हाण (३६), रा. अयोध्यानगर, सोयगाव व बाळू सुकदेव घुमाडे (३१), रा. पिंपळगाव बहुला (नाशिक) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मद्य व वाहनासह तीन लाख ७४ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक हगवणे, पोलीस हवालदार भूषण खैरनार, संदीप गुरव, अक्षय पाटील, दीपक वानखेडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Soldiers of Malegaon country liquor seized