शेतातील माती गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:44 PM2020-06-30T22:44:24+5:302020-06-30T22:45:09+5:30

पाडळदे : मालेगाव परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे ओवाडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ओवाडी नाल्यात पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत छोटे छोटे बंधारे बांधले आहेत. त्यात एक बंधारा वडगाव येथील रंगनाथ वडगे यांच्या शेताजवळ बांधला आहे.

The soil in the field was carried away | शेतातील माती गेली वाहून

वडगाव परिसरातील शेतातील वाहून गेलेली माती.

Next
ठळक मुद्देपेरलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्क
पाडळदे : मालेगाव परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे ओवाडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ओवाडी नाल्यात पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत छोटे छोटे बंधारे बांधले आहेत. त्यात एक बंधारा वडगाव येथील रंगनाथ वडगे यांच्या शेताजवळ बांधला आहे.
ओवाडी नाल्याला आलेल्या पुरामध्ये मोठमोठी झाडेसुद्धा वाहून आली, ती झाडं बंधाºयात अडकली. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा फुगवठा तयार झाला. त्यामुळे नाल्यातील पाणी बांध फोडून शेतामध्ये घुसले. शेतातून परत ते पुढच्या बाजूने नाल्यांमध्ये आले त्याचा मोठा फटका रंगनाथ वडगे, अशोक वडगे यांच्या शेतीला बसला आहे.
यांच्या शेतीतील हजारो ट्रॅक्टर माती वाहून गेली. पेरलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यांचे वर्षभराचे पीक वाया गेले आहे. मोठ्या कष्टाने शेती  केली, बी- बियाणे आणून शेत पेरले होते; पण पूर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे व हजारो ट्रॅक्टर माती वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकºयाचा लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The soil in the field was carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.