शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कसारा घाटात रेल्वे रुळावर मातीचा ढिगारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:32 IST

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसामुळे गुरुवारी (दि.११) कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळील बोगद्याबाहेर मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर पडल्याने मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

नाशिक : इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसामुळे गुरुवारी (दि.११) कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळील बोगद्याबाहेर मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर पडल्याने मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली. या घटनेत प्रकल्पात उभी असलेली वाहने वाहून गेल्याचे समजते तर प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उद््ध्वस्त झाल्या आहेत.घाटमाथ्यावर एकाच दिवसात १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली. कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळील बोगद्याबाहेर मातीचा मोठा ढिगारा थेट रेल्वे रुळावर पडल्याने (डाउन)कडील मुंबईहून येणाºया मेल एक्स्प्रेस गाडयांची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे विभागाच्या आपत्ती विभागाने ढिगारा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.यामुळे रेल्वे एक ते दीड तास उशिराने धावत आहेत. पावसाने त्र्यंबकेश्वर-जव्हार-पालघर रस्ताही बंद झाला असून त्र्यंबक-नाशिकला येणाºया मोरचुंदी पुलाच्या बाजूला रस्त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. जव्हारहून जव्हार फाटा पुलाची वाडी, धोंड माºयाचीमेट, तळवाडा फाटा मार्गे त्र्यंबकेश्वर गाठून पुढे नाशिककडे जाता येऊ शकते. त्यामुळे या मार्गाचा वापर करावा अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.इन्फोपावसामुळे मुंबईला वीजपुरवठा करणाºया वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली. या घटनेत प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या आहेत. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची हत्यारेही वाहून गेल्याचे वृत्त आहे. विजनिर्मितीचे कामही थांबवण्यात आले आहे.——-फोटो आहोत

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेRainपाऊस