सामाजिक कार्यकर्त्यांनी केली गरिबांच्या जेवणाची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:40 IST2020-04-03T22:40:30+5:302020-04-03T22:40:43+5:30

अनेक दिवसांपासून लॉकडाउन असल्यामुळे गावागावांत गोरगरीब, गरजू लोकांचे जेवणाचे हाल होत होते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांच्या जेवणाची सोय करून दिली आहे.

Social workers provided food for the poor | सामाजिक कार्यकर्त्यांनी केली गरिबांच्या जेवणाची सोय

सामाजिक कार्यकर्त्यांनी केली गरिबांच्या जेवणाची सोय

लासलगाव : गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाउन असल्यामुळे गावागावांत गोरगरीब, गरजू लोकांचे जेवणाचे हाल होत होते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांच्या जेवणाची सोय करून दिली आहे.
त्याचप्रमाणे होम कॉरण्टाइन असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्तासाठी असलेले पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी यांनाही जेवण पुरविण्यात येत आहे. यात महेश होळकर, मयूर बोरा, व्यंकटेश दायमा, प्रतीक चोथाणी, विशाल पालवे, मनोज ब्रह्मेचा,सूरज आबड, सतीश पवार, राहुल गवळी, संदीप देवरे, नितीन सावजी, बाळा सावजी, सुरेश पिडीयार, मयूर दगडे, पंकज डांगरे, आदित्य भंडारी, सुरेश गवळी यांनी सहभाग नोंदविला आहे.

Web Title: Social workers provided food for the poor