सोशल मीडिया ठरेल भाविकांसाठी पर्वणी

By Admin | Updated: June 18, 2015 00:19 IST2015-06-17T23:52:57+5:302015-06-18T00:19:04+5:30

एका क्लिकवर माहिती उपलब्ध : अ‍ॅप्सचाही फायदा; सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांना होणार मदत

Social media will be the festival for the devotees | सोशल मीडिया ठरेल भाविकांसाठी पर्वणी

सोशल मीडिया ठरेल भाविकांसाठी पर्वणी

नाशिक : नाशिकमध्ये बारा वर्षांपूर्वी भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे अनेक साक्षीदार आहेत. पण नव्या पिढीला आणि बाहेरच्या शहरांमधून नाशिकमध्ये विस्थापित झालेल्यांना मात्र हा कुंभमेळा काय असतो याची उत्सुकता आहे. ही उत्सुकता कुंभमेळ्यात शमणार असे अजिबात नसून, वेबसाइट व सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर तयार केलेल्या ढिगभर अ‍ॅप्सच्या माध्यमातून सिंहस्थाची
माहिती मिळविणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे भाविकांना सोशल मीडिया पर्वणी ठरेल, यात काही
शंका नाही.

Web Title: Social media will be the festival for the devotees