बेड, गाद्या भेट देऊन जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:55 IST2021-06-16T23:22:45+5:302021-06-17T00:55:19+5:30
चांदोरी : चांदोरी येथील शरद नाठे व भगवंत हांडगे या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांसाठी १० बेड, गाद्या व सलाईन स्टँड देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

रुग्णालयासाठी आवश्यक असलेले साहित्य डॉ. नवलसिंग चौहाण यांच्याकडे सुपूर्द करताना शरद नाठे, भगवंत हांडगे, देवराम निकम, बबन टर्ले आदी.
चांदोरी : चांदोरी येथील शरद नाठे व भगवंत हांडगे या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांसाठी १० बेड, गाद्या व सलाईन स्टँड देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोरोनाच्या महामारीत आरोग्य व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना त्यांना अनेक रुग्णांना असुविधांचा सामना करावा लागला होता. शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरू केली आहे. चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेन्टर सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर चांदोरी येथील शरद नाठे व भगवंत हांडगे या दोघांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने प्राथमिक आरोग्य केंद्राला बेड, गाद्या आदी वस्तू निफाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चौहाण, केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मुकुंद सवाई, आरोग्य सहायक अरुण कहांडळ यांच्याकडे सुपूर्त केल्या. यावेळी चांदोरीचे माजी सरपंच देवराम निकम, बबन टर्ले, योगेश चारोस्कर, गणेश टर्ले, नामदेव टर्ले,अनिल टर्ले, प्रताप गायकवाड, साईनाथ काळे, संदीप रोकडे, रावसाहेब गडाख, उलकेश पंडित, आकाश गायकवाड आदी उपस्थित होते.