शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शहरात स्वाइन फ्लूचे आत्तापर्यंत दहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 1:21 AM

शहरात गेल्या सात महिन्यांत दीडशे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून, त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक पथक शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये येणार असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

ठळक मुद्देदीडशे जणांना लागण : सात महिन्यांतील स्थिती, आज तज्ज्ञांचे मार्गदर्शन

नाशिक : शहरात गेल्या सात महिन्यांत दीडशे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून, त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक पथक शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये येणार असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये जुलै महिन्याच्या प्रारंभीच चार रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेने तातडीने तपासणी करून डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणाºया ३८२ व्यक्ती आणि संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.पावसाळा आला की, शहरात रोगराई सुरू होते. सध्या पावसाळा सुरू झाल्याने अन्य रोगांची सुरुवात होत असतानाच जानेवारीपासून सुरू असलेल्या स्वाइन फ्लूचे थांबण्याचे नाव नाही. शहर कितीही स्मार्ट करण्याचा प्रयत्न झाला तरी आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था कायम आहे. गेल्यावर्षी नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा केवळ एकच रुग्ण आढळला होता आणि त्याचाच मृत्यू झाला होता. यंदा मात्र जानेवारी महिन्यापासूनच रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जानेवारीत सात, फेब्रुवारीत ४२, मार्च महिन्यात ५०, एप्रिल ३७, मे महिन्यात ११ तर जून महिन्यात तीन आणि जुलै महिन्यात एक याप्रमाणे आत्तापर्यंत १५० रुग्ण आढळले आहेत. त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात आढळलेल्या एकमेव रुग्णाचा मृत्यू झाला आहे.राज्यात सर्वाधिक स्वाइन फ्लू रुग्ण असलेल्या यादीत नाशिकचा क्रमांक आघाडीवर असून विषाणू बदलत असल्याने त्यावर सातत्याने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याचे एक पथक शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये येणार असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात सकाळी ११ वाजता महापालिका तसेच शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच विविध वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना साथ रोगाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात आरोग्य विभागाचे संचालक डॉ. अर्चना पाटील, साथरोग विभागाचे डॉ. प्रदीप आवटे, सहसंचालक डॉ. भोई यांच्यासह अन्य तज्ज्ञ मार्गदर्र्शन करणार आहेत.डेंग्यूचा प्रादुर्भाव, चार जणांना लागणशहरात डेंग्यूची लागण सुरू झाली असून, जानेवारीपासून आत्तापर्यंत १९ जणांना लागण झाली आहे तर जुलै महिन्यात चार जणांना डेंग्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ३८२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यात ९८ घरगुती, ७ तळघरे, १६६ भंगार व टायर्स दुकाने, ६ गटार गळती, ४७ नवीन बांधकामे, १४ शाळा तर प्राणी आणि पक्ष्यांना पाणी ठेवणाºया ३५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्य