सर्पांपेक्षा ‌‌कथित सर्पमित्रांचाच अधिक सुळसुळाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:50+5:302021-02-05T05:38:50+5:30

नाशिक शहर व परिसरात कथित सर्पमित्रांची वाढती संख्या आणि त्यांच्याचपैकी अनेकांकडून सर्पांचे केले जाणारे ‘हॅन्डलिंग’ आता चर्चेचा विषय ठरत ...

The so-called serpent-friends are more comfortable than snakes! | सर्पांपेक्षा ‌‌कथित सर्पमित्रांचाच अधिक सुळसुळाट!

सर्पांपेक्षा ‌‌कथित सर्पमित्रांचाच अधिक सुळसुळाट!

नाशिक शहर व परिसरात कथित सर्पमित्रांची वाढती संख्या आणि त्यांच्याचपैकी अनेकांकडून सर्पांचे केले जाणारे ‘हॅन्डलिंग’ आता चर्चेचा विषय ठरत आहे. कथित सर्पमित्र सर्प रेस्क्यू करताना अतीउत्साह अन‌् बघ्यांसमोर आपली ‘छाप’ पाडण्याच्या उद्देशाने कुठल्याहीप्रकारे सुरक्षा साधनांचा वापरदेखील करत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना संबंधित कथित सर्पमित्रांकडून तिलांजली दिली जात आहे.

अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या सापाला वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२नुसार संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. साप हा पृष्ठवर्णीय प्राणी असून तो पूर्णपणे मांसाहारी आहे. तो सस्तन प्राणी नसल्याने दूध अजिबात पीत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

---इन्फो---

कथित सर्पमित्रांकडून जनप्रबोधनाला फाटा

सर्पांविषयी जागरुकता निर्माण करणे हाच प्रयत्न खऱ्याखुऱ्या सर्पमित्रांकडून होणे अपेक्षित आहे; मात्र, शहरात असे अपवादानेच बघावयास मिळते. व्यसनाधीन कथित सर्पमित्रांचा वाढता सुळसुळाट हा सर्पांच्याही जीवावर उठणारा आहे. यामुळे पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या शहर व आजूबाजूच्या उपनगरांचा परिसरातील कथित सर्पमित्रांचा सुळसुळाट थांबणार का? असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

--

‘एसओपी’ म्हणजे काय रे भाऊ..?

नागपूर येथील वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यलयाकडून मानव-सर्प संघर्ष कमी करण्यासाठी सर्प हाताळण्याबाबतची प्रमाणित कार्यपध्दती (एसओपी) मुंबईच्या रॅपटाइल रेस्क्यू-रिसर्च सेंटरच्या मदतीने २०१६साली जाहीर केली आहे. ही कार्यपध्दती जंगलासह ग्रामीण भाग, निमशहरी भाग तसेच शहरी भागालाही लागू होते. मात्र, ही नियमावली आणि मार्गदर्शक प्रणाली शहरातील कथित सर्पमित्रांच्या गावीच नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.

---

सापांना कायद्याने संरक्षण

अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या सापाला वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२नुसार संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. साप हा पृष्ठवर्णीय प्राणी असून तो पूर्णपणे मांसाहारी आहे. तो सस्तन प्राणी नसल्याने दूध अजिबात पीत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. साप हे शीतरक्ती असून त्यांना आवाजाचे ज्ञान हे जमिनीवर सरपटताना कंपनावरून होत असते. सापाला डिवचणे किंवा मारून टाकणे कायद्याने गुन्हा ठरतो.

----

‘रेस्क्यू’चा मांडला जातोय खेळ

वन्यजीव विभागाच्या मार्गदर्शिकेत स्पष्टपणे म्हटले आहे की, जेव्हा गरज असेल तेव्हाच सापाला रेस्क्यू करावे. अन्यथा रेस्क्यू करू नये; मात्र, शहरात कथित सर्पमित्रांकडून सर्रासपणे सापांना रेस्क्यू करण्याच्या नावाखाली भलताच ‘खेळ’ मांडला जात असल्याने वन्यजीवप्रेमी संस्थांनी नाराजी दर्शविली आहे. प्रत्येक सापाला केवळ दोनदाच एकदा पकडताना आणि दुसऱ्यांदा योग्य नैसर्गित अधिवासात मुक्त करताना हाताळावे, असा नियम मार्गदर्शिकेत सांगितला आहे. मात्र, हा नियम केवळ कागदोपत्रीच असून कथित सर्पमित्रांकडून याकडे कानाडोळा केला जातो.

--

फोटो आर वर ३०स्नेक नावाने.

===Photopath===

300121\30nsk_13_30012021_13.jpg~300121\30nsk_14_30012021_13.jpg

===Caption===

स्टंटबाजी संग्रहित~स्टंटबाजी-संग्रहित

Web Title: The so-called serpent-friends are more comfortable than snakes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.