शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती : गिरीश कुबेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:28 IST

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामधील विशाखा सभागृहात ‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लोकेश शेवडे यांनी कुबेर यांची गुरुवारी (दि.८) मुलाखत घेतली.

ठळक मुद्दे बंदीची मागणी संकुचित विचारसरणीचे लक्षणबंदीमधून पर्यायपुढे येतो आणि बंदी अयशस्वी होते, दुर्दैवाने पत्रकारांची विचारसरणी मर्यादित स्वरूपाची झाली

नाशिक : पत्रकारिता आणि लेखनसाहित्य याचा परस्पर संबंध आहे, हे नाकारून चालणार नाही किंवा याविषयी मनात शंकाही येऊ नये. त्या-त्या काळातील साहित्य हे पत्रकारितेतून पुढे आले आहे व तशा नोंदी इतिहासात आहे. बातमीच्या पलीकडे जाऊन काही तरी वेगळं शोधण्याची इच्छाशक्ती व दृष्टिकोन पत्रकारांनी बाळगला तर उत्तम साहित्यनिर्मिती होणे शक्य आहे, असे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुलाखतीतून मांडले.कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमांतर्गत गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामधील विशाखा सभागृहात ‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लोकेश शेवडे यांनी कुबेर यांची गुरुवारी (दि.८) मुलाखत घेतली. यावेळी त्यांच्या विविध प्रश्नांची कुबेर यांनी दिलखुलासपणे उत्तरे देत साहित्य, कला आणि संस्कृतीची पत्रकारितेशी जुळलेली नाळ आणि पत्रकारांनी सभोवतालच्या घडलेल्या घटनांचे साक्षीदार म्हणून केलेले घटनापलीकडील साहित्यलेखनावर प्रकाश टाकला. यावेळी कुबेर म्हणाले, जे सभोवताली आपल्या डोळ्यांना दिसत असतं त्यापलीकडेही खूप काही घडत असतं; मात्र आज दुर्दैवाने पत्रकारांची विचारसरणी बातमी व अंक एवढी मर्यादित स्वरूपाची झाली आहे. बातमीच्या पलीकडे जाऊन विचार केल्यास मोठा ऐवज हाती लागू शकतो हा विश्वास पत्रकारांनी बाळगल्यास साहित्यनिर्मिती होऊ शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.बंदीची मागणी संकुचित विचारसरणीचे लक्षणकुठल्याही बंदीची मागणी करणे हे समाजाच्या संकुचित विचारसरणीचे लक्षण आहे. कारण अद्याप कुठलीही बंदी कुठेही यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे जरी क ोणत्या पुस्तकावर बंदी घातली गेली तरी ते पुस्तक लोकांकडून चोरून का होईना वाचले जाणार हे निश्चित असते. बंदीमधून पर्यायपुढे येतो आणि बंदी अयशस्वी होते, असे कुबेर म्हणाले.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजJournalistपत्रकारliteratureसाहित्यNashikनाशिक