सिडकोमध्ये सहा तोळ्यांची चेन हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 01:38 IST2022-02-25T01:38:15+5:302022-02-25T01:38:35+5:30

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको परिसरात गुरुवारी (दि.२४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Snatched a chain of six weights in CIDCO | सिडकोमध्ये सहा तोळ्यांची चेन हिसकावली

सिडकोमध्ये सहा तोळ्यांची चेन हिसकावली

नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको परिसरात गुरुवारी (दि.२४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील रहिवासी पल्लवी दिलीप पगार (४५) या रात्रीच्या सुमारास कॉलनी परिसरातील रस्त्यावर शतपावली करत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्याजवळ येत गळ्यातील सुमारे ६० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. त्यांनी व परिसरातील रहिवाशांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. ‘गुगल’ श्वानाला घेत घटनास्थळी हॅण्डलर गणेश कोंडे हे दाखल झाले. गुगलने कॉलनी रस्त्यावरून चोरटे बाहेर कुठल्या दिशेने पसार झाले, त्याचा माग पोलिसांना दाखविला.

Web Title: Snatched a chain of six weights in CIDCO