कंपनी मधून निघणाऱ्या धुराने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:16 PM2020-09-09T17:16:37+5:302020-09-09T17:17:57+5:30

विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वसाहत लगत धोकादायक असा फोर्जिंग व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून केला जात असून सदर कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि ध्वनीप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Smoke from the company endangers health | कंपनी मधून निघणाऱ्या धुराने आरोग्य धोक्यात

कंपनी मधून निघणाऱ्या धुराने आरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देविल्होळी : प्रदूषण मंडळाने कारवाई करूनही परिस्थिती अद्याप जैसे थेच...

विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वसाहत लगत धोकादायक असा फोर्जिंग व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून केला जात असून सदर कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि ध्वनीप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रदूषणाने आसपासच्या बालक, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाला आहे. रात्री अपरात्री कंपनीमधून यंत्राचा मोठा आवाज येत असल्याने त्यापासून नागरिकांची झोप मोड होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन नागरी वसाहतीतील नागरिकांनी ग्रामपंचायत विल्होळी, अधीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सातपूर यांना निवेदन दिले. कंपनी मधून येणारा विषारी वायू व मोठे आवाज त्वरित बंद करण्यात यावेत, त्यामुळे आरोग्य धोका निर्माण होवू शकतो. कंपनीने याबाबत यावायूसाठी उंच चिमणी उभारावी, सदर ठिकाणी कमी आवाज येईलअशा प्रकारच्या यंत्रांचा वापर करण्यात यावा, कुठलेही रसायन अथवा साहित्य जमिनीत मुरणार नाही याची दक्षता घ्यावी, कारखान्यास असलेले छत नादुरु स्त असून त्यातून विषारी वायू बाहेर पडतो ते तात्काळ दुरु स्त करावे, लॉक डाऊन नियमांचे पालन करावे अशा प्रकारची निवेदन ग्रामपंचायत व प्रदूषण मंडळाला देऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरी सुद्धा प्रदूषण मुक्त विषारी वायू बाहेर पडत असून नागरी वसाहतीतील धोका निर्माण होत आहे.
परिसरातील कंपनीमधून विषयुक्त वायू बाहेर पडत असून त्यामुळे नागरी वसाहतीतील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीस निवेदन दिले आहे. नागरिकांच्या तक्र ारी नुसार त्वरित कंपनी मालकास नोटीस पाठविण्यात आली असून सदर विषारी युक्त निघणाºया धुराचा बंदोबस्त करावा असे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबतची तक्र ार प्रदूषण नियंत्रण महामंडळास करण्यात आली आहे.
- बळीराम पगार, ग्रामविकास अधिकारी विल्होळी.
आम्ही राहत असलेल्या ठिकाणी कारखान्यांमधून येणारा विषारी वायू व आवाज बंद व्हावा यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई करावी. व परिसरातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे तो थांबावा यासाठी ग्रामपंचायत व प्रदूषण मंडळाने पुढाकार घ्यावा.
- ज्ञानेश्वर मते, नागरिक. (फोटो ०९ विल्होळी,१)


 

Web Title: Smoke from the company endangers health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.