नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे

By Suyog.joshi | Published: February 2, 2024 10:21 PM2024-02-02T22:21:03+5:302024-02-02T22:21:12+5:30

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (सेवा) स्मिता झगडे यांनी शुक्रवारी पदभार स्विकारला.

Smita Jagde as Additional Commissioner of Nashik Municipality | नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे

नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे

नाशिक (सुयोग जोशी) : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (सेवा) स्मिता झगडे यांनी शुक्रवारी पदभार स्विकारला. यावेळी त्यांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी. उपायुक्त पर्यावरण विजयकुमार मुंडे, उपायुक्त प्रशासन लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त कर श्रीकांत पवार यांनी केले. गेल्या सहा महिन्यांपासून भाग्यश्री बानायत यांची बदली झाल्यांनतर ही जागा रिक्त होती. झगडे या पिंपरी चिचवड महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मिता झगडे ६ जानेवारी २०१८ मध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर शासन प्रतिनियुक्तीने रुजू झाल्या होत्या. त्यानंतर १ फेब्रुवारी २०२१ मध्ये झगडे यांचे उपआयुक्त पदावर पदोन्नती झाली.  शासनाने झगडे यांची नाशिक मनपात अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मनपात दोन अतिरिक्त आयुक्त पद असून बानायत यांच्या बदलीमुळे त्यांचा प्रभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी (शहर) यांच्याकडे होता. झगडे यांच्या नियुक्तीमुळे त्यांची प्रभारीतून मुक्तता होईल. झगडे यांच्याकडे आरोग्य, अग्निशमन, घनकचरा संकलन, मलेरिया यासारखे महत्वाचे विभागाचे कामकाज राहणार आहे.

Web Title: Smita Jagde as Additional Commissioner of Nashik Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.